घरमहाराष्ट्रनाशिकबागलाण तालुक्यात आजपासून क्षयरोग, कुष्ठरोग शोधमोहीम

बागलाण तालुक्यात आजपासून क्षयरोग, कुष्ठरोग शोधमोहीम

Subscribe

सटाणा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे क्षयरोग व कुष्ठरोग मुक्त भारत साकार करण्यासाठी बागलाण तालुक्यात आज दि. १३ ते ३० सप्टेंबर या कालावधीत सक्रिय कुष्ठरोग व क्षयरोग शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. दरम्यान मागील वर्षाच्या तुलनेत क्षयरोगाच्या रुग्णसंख्येत १३४ ने गट झाल्याचे दिसून आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. कपिल आहेर, कुष्ठरोग सहाय्यक संचालक डॉ. भोये, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख, डॉ. हर्षल नेहते, डॉ. युवराज देवरे, गटविकास अधिकारी पी.एस. कोल्हे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन गायकवाड व तालुका आरोग्याधिकारी डॉ. हर्षलकुमार महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात ३०० प्रशिक्षित टीमद्वारे ७१६६२ घरांचे क्षयरोग व कुष्ठरोग यांची संयुक्त तपासणी करून निदान झाल्यावर औषध उपचार देण्यात येणार आहेत.

कुष्ठरोगाची लक्षणे

शरीरावर फिकट, लालसर बधिर चट्टा, मज्जा तंतू जाड व दुसर्‍या होऊन हातापायास बधिरता येणे, चकाकणारी तेलकट व सुजलेली त्वचा, कानाच्या पाकळ्या जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे.

- Advertisement -
कुष्ठरोग रुग्ण

(सन २०२२-२३)
वयोगट ० ते २० : ४ रुग्ण
२१ ते ४० : ५१ रुग्ण
एकूण : ५५ रुग्ण

क्षयरोगाची लक्षणे

दोन आठवड्याहून अधिकचा खोकला, दोन आठवड्याहून अधिक कालावधीचा ताप, वजनात घट होणे, भूक न लागणे, मानेवर गाठी येणे इत्यादी.

- Advertisement -
क्षयरोग रुग्ण

वयोगट ० ते २० : ९ रुग्ण
२१ ते ४० : ७० रुग्ण
४१च्या पुढील : ७५

क्षयरोग रुग्णांचे प्रमाण कमी होत असून गेल्या वर्षी २८८ रुग्ण होते. क्षयरोग मोहीम प्रभावीपणे राबवून रुग्णांवर वेळीच उपचार सुरू केल्याने ही संख्या चालूवर्षी १५४ वर आली आहे. उपचार सुरू केल्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांवर आहे. कुष्ठरोग रुग्णांचे प्रमाणही देखील कमी होत असून लक्षणे दिसून येणार्‍या रुग्णांनी तात्काळ जवळच्या आरोग्यकेंद्राशी संपर्क साधून उपचार करून घ्यावे. : डॉ. हर्षलकुमार महाजन, तालुका आरोग्य अधिकारी

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -