घरमहाराष्ट्रनाशिक‘ट्राय’च्या नियमावलीला चॅनेल्सकडून छेद; ग्राहकांना थेट पॅकेजची सक्ती

‘ट्राय’च्या नियमावलीला चॅनेल्सकडून छेद; ग्राहकांना थेट पॅकेजची सक्ती

Subscribe

एक फेब्रुवारीपासून केबल होणार बंद

‘ट्राय’च्या आदेशानुसार आता ग्राहकांना १५३ रुपयांत १०० चॅनेल्स ग्राहकांना पुरवायची आहेत. अर्थात या पॅकेमध्ये ग्राहक आपल्या पसंतीची चॅनेल निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. ग्राहक जितके चॅनेल निवडतील तेवढेच पैसे ग्राहकांना मोजावे लागणार आहेत. मात्र काही ऑपरेटरकडून ट्रायच्या या नियमावलीला छेद देत चॅनेलचे बुके अर्थात गट तयार करून हे गट खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे. या पॅकेजमध्ये फ्री आणि पेड अशा दोन्ही प्रकारच्या चॅनेल्सचा सामावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमावस्था कायम आहे. अद्यापही ग्राहकांना ही प्रणाली समजू शकलेली नाही; परंतु १ फेब्रुवारीपासून केबल बंद होणार असून केवळ फ्री टू एअर चॅनेल्स दिसणार आहेत.

१५३ रुपयांत मिळणार्‍या १०० चॅनेल्समध्ये प्रसारभारतीची २४ चॅनेल्स असणार आहेत. याशिवाय उर्वरित चॅनेल्समध्ये ग्राहक मोफत किंवा सशुल्क चॅनेल्सचा समावेश या १०० चॅनेल्समध्ये करू शकतो. मोफत चॅनेल्सचे पैसे ग्राहकाला द्यावे लागणार नाहीत; पण सशुल्क चॅनेल्सबाबत मात्र केवळ त्याच चॅनेल्सचे पैसे ग्राहकाला द्यावे लागतील. ग्राहकाला १०० पेक्षा अधिक चॅनेल्स हवी असतील तर त्याला अतिरिक्त क्षमता फी भरावी लागेल, ती दर २५ चॅनेल्सना २० रुपये असणार आहे. एकूणच ‘ट्राय’चा हा निर्णय ग्राहकांच्या हिताचा आहे. ट्रायच्या नियमावलीमुळे ग्राहकांना लाभ होईल व सध्यापेक्षा कमी किमतीत त्यांना मनाजोगत्या वाहिन्या पाहता येतील. चॅनेल निवडण्यासाठी १ ते ४९ रूपयांपर्यंत दर निश्चित करण्यात आले आहेत. ग्राहकांना आपल्या आवडीनुसार चॅनल निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले असले तरी काही ऑपरेटर्सकडून चॅनेल्सचे पॅकेज बनविण्यात आले आहे. त्यानुसार ग्राहकांना दरमहा ३०० रूपयांहून अधिक दर मोजावे लागणार आहेत. त्यामुळे ट्रायच्या नियमावलीला छेद देण्याचा प्रयत्न याद्वारे होत असल्याचेच दिसून येते. केबल ऑपरेटरलाही याबाबत पुरेशी माहिती प्राप्त होत नसल्याने केबल चालकही संभ्रमात असल्याचेच दिसून येते.

- Advertisement -

अन्यथा कारवाई

’ट्राय’ने घालून दिलेल्या नव्या नियमावलीनुसार प्रत्येक चॅनलची किंमत निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे कुठल्याही अतिरिक्त चॅनलची सेवा घेण्यासाठी ग्राहकांना जास्तीत जास्त १९ रुपये मोजावे लागणार आहेत. केबल सेवा पुरविणार्‍यांनी त्याहून अधिक शुल्क आकारल्यास त्यांच्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

केबल चालकांसाठी अ‍ॅप

ग्राहकांसाठी चॅनल पॅक तयार करण्यासाठी ’ट्राय’ने तयार केलेल्या वेब अ‍ॅपला ’चॅनेल सिलेक्टर’ नाव देण्यात आले आहे. केबल ऑपरेटरला ग्राहकांची माहिती या अ‍ॅपद्वारे लोड करावी लागणार आहे. मात्र याबाबत पुरेसे प्रशिक्षण नसल्याने ऑपरेटरने ग्राहकांना आपल्या चॅनेल्सची यादी तयार करण्याचे सूचित केले असून उपलब्ध मनुष्यबळानुसार हे चॅनल अ‍ॅपवर नोंदवले जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -