घरक्राइमअल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोघा नराधमांना २० वर्ष शिक्षा

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोघा नराधमांना २० वर्ष शिक्षा

Subscribe

सुरगाणा येथील प्रकार

नाशिक : सुरगाणा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचे दोन वर्षांपूर्वी अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणार्‍या दोघा नराधमांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने 20 वर्षांची शिक्षा सुनावली. यासंदर्भात जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. अ‍ॅड. दीपशिखा भिडे यांनी युक्तिवाद करत प्रकरण न्यायालयामोर मांडले. त्यानुसार जिल्हा न्यायाधीश डी. डी. देशमुख यांनी आरोपी हरिश्चंद्र नथू गायकवाड, विलास पुंडलिक चौधरी यांना 20 वर्षाचा करावास, १३ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात 24 जून 2020 रोजी सायंकाळच्या सुमारास अवघ्या 14 वर्षीय शाळकरी मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी सुरगाणा पोलिसांनी सखोल तपास करत मुलीचा तब्बल सहा ते सात दिवस शोध घेतला. हा तपास सुरू असताना गावाशेजारील दोघा तरुणांचा सहभाग निदर्शनास आला होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार चौकशी केली असता गायकवाड आणि चौधरी या दोघांनी मुलीचे अपहरण केल्याचे दिसून आले. दोघांनी जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांत, वेगवेगळ्या गावांमध्ये ४ जुलैपर्यंत या मुलीवर वेळोवेळी बळजबरीने शरीर संबंध प्रस्थापित केल्याचा धक्कादायक प्रकारही उघडकीस आला होता. चौधरी आणि त्याच्या दुचाकीचा अपहरणासाठी वापर केला गेला होता.

- Advertisement -

त्यानुसार, पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी या दोघा संशयितांविरुद्ध बलात्कार व बालकाच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम अंतर्गत (पोस्को) गुन्हा दाखल केला होता. चौकशीअंती दोघांना पोलिसांनी 6 जुलै 2020 रोजी ताब्यात घेतले. यानंतर त्यांना आठ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. तेथून न्यायालयीन कोठडीत त्यांची रवानगी करण्यात आली.पोलिसांनी गुन्ह्याचा सखोल तपास करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. अंतिम सुनावणीप्रसंगी सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. दीपशिखा भिडे यांनी युक्तीवाद केला. यावेळी ७ साथीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावे व साक्षीदारांची साक्ष लक्षात घेऊन न्यायालयाने या दोघांविरोधात गुन्हा सिद्ध होऊन २० वर्षांची व व १३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -