घरक्राइमचेष्टा मस्करी पडली महागात; दोन तरुणांना सात वर्षांचा तुरुंगवास

चेष्टा मस्करी पडली महागात; दोन तरुणांना सात वर्षांचा तुरुंगवास

Subscribe

चेष्टा मस्करीत एका तरुणाचा डोक्यात थप्पड मारणे दोनजणांना चांगलेच महागात पडले. संबंधित तरुणाने विचारणा केल्याच्या रागातून त्याचा चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणी गुरुवारी (दि.२२) जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. वाघवसे यांनी दोघांना सात वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना २९ जानेवारी २०१८ रोजी सिद्धीविनायक गार्डन पाठीमागे, शिवशक्ती चौक, शिवाजीनगर, नाशिक येथे घडली होती.

आकाश सुरेश पवार (वय २७, रा.शिवाजीनगर, नाशिक), तुषार दिनेश लांडे (वय २८, रा. अशोकनगर, नाशिक) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहे. तर बबन सोमा बेंडकुळे (वय २५, शिवाजीनगर, नाशिक) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.
बबन बेंडकुळे हे सिद्धीविनायक गार्डनजवळ मोबाईलवर बोलत होते. त्यावेळी आकाश पवार व तुषार लांडे दुचाकीवरुन त्याच्याजवळ आले. त्यावेळी काहीएक कारण नसताना चेष्टामस्करीत आकाशने बबनच्या डोक्यात थप्पड मारली. याप्रकरणी बबनने विचारणा केली असता राग अनावर झाल्याने दोघांनी संगनमताने त्यास मारहाण केली. तुषारने बबनचा हात पकडला. तर आकाशने त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. त्यानंतर दोघेजण पळून गेले. त्यात तो गंभीर जखमी झाला. उपचारार्थ त्याला खासगी रुग्णालयात करण्यात आले होते. याप्रकरणी बबन बेंडकुळे याने गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, उपचार सुरु असताना बबनचा ११ फेब्रुवारी २०१८ रोजी मृत्यू झाला. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एस. एस. वाघ यांनी दोघांविरुद्ध सबळ पुरावे गोळा करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. गुरुवारी (दि.२२) जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. वाघवसे यांनी आरोपीविरुद्ध फिर्यादी, साक्षीदार व पंचांनी दिलेली साक्ष आणि परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरुन दोघांना शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता योगेश कापसे यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून गणेश पिंगळे व कोर्ट अंमलदार पोलीस नाईक एस. यू. गोसावी यांनी पाठपुरावा केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -