घरताज्या घडामोडीजि. प. पदाधिकारी देणार महिन्याचे मानधन

जि. प. पदाधिकारी देणार महिन्याचे मानधन

Subscribe

भाजप गटनेते डॉ.आत्माराम कुंभार्डे यांच्याकडून पाच लाखांची मदत

नाशिक : राज्यात ओढवलेल्या करोना संकटाचा सामना करण्यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्षांसह पदाधिकारी सरसावले आहेत. अध्यक्षांसह पदाधिकाºयांनी आपले एक महिन्यांचे मानधन हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस सदस्यांचे महिन्यांचे मानधन देखील वर्ग केले जाणार आहे.
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर देशभरात आणीबाणी सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारी पातळीवर मदत कार्य सुरू असून आर्थिक मदतीची मोठी गरज राज्य शासन व केंद्र शासनाला आहे. अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर व उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड, कृषी सभापती संजय बनकर, आरोग्य, शिक्षण सभापती सुरेखा दराडे, महिला बालकल्याण सभापती आश्विनी आहेर, समाजकल्याण सभापती सुशिला मेंगाळ यांनी आपले एक महिन्यांचे वेतन हे कोरोनाच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
……
डॉ. कुंभार्डे यांच्याकडून पाच लाखांचे सेस
दरम्यान, भाजप सदस्यांनी आपले एक महिन्यांचे मानधन भाजप आपदा कोषमध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कोरोनाला जिल्हास्तरावर मदत व्हावी यासाठी माझ्या वाटयाला आलेल्या सेसमधून ५ लाखांचा सेस हा जि.प. आरोग्य विभागाला वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. या निधीतून प्रामुख्याने ग्रामीण भागात खाजगी आरोग्य सेवा देत असलेल्या डॉक्टर, सेविका यांना मास्कसह कीट उपलब्ध करून द्यावे. खाजगी आरोग्य सेवा बजावितांना मोठा धोका पत्करत आहे. यासाठी या डॉक्टरांना तसेच शासकीय आरोग्य सेवेतील कार्यरत असलेल्या कर्मचाºयांसाठी देखील कीट या निधीतून उपलब्ध करून द्यावे. याबाबतचे पत्र अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांना देणार आहे.
-डॉ. आत्माराम कुंभार्डे (गटनेते, भाजप जिल्हा परिषद)

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -