घरनवी मुंबईशिवसेना एकटीच श्रेय घेत असेल तर वेगळा विचार करावा लागेल; आव्हाड यांचा...

शिवसेना एकटीच श्रेय घेत असेल तर वेगळा विचार करावा लागेल; आव्हाड यांचा इशारा

Subscribe

राज्यात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडी सत्तेवर आहे. राज्यात सत्तेच्या वाट्यात वाटा मिळवणारी शिवसेना मात्र नवी मुंबईत राष्ट्रवादीला विश्वासात न घेता विकासकामांचे श्रेय घेत असल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त करत आगामी महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा शिवसेनेला दिला आहे. ऐरोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या उद्घाटन सोहळ्यात शिवसेनेने राष्ट्रवादीला निमंत्रित न केल्याने या बाबत शिवसेना नेते आणि मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना जाब विचारणार असल्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन सोहळा आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन लक्ष्मीनारायण सभागृह ऐरोली सेक्टर ८ येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून गृहनिर्माण मंत्री डॉ. आव्हाड उपस्थित होते. मार्गदर्शन करताना गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी शिवसेना जर एकाच पद्धतीने काम करत असेल, तर एक प्रकारे भाजपाला सत्तेची दार स्वतः खुले करून देत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

- Advertisement -

महाविकास आघाडी करण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न केले. परंतु महाविकास आघाडीतील शिवसेना राष्ट्रवादीला विचारात घेत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली असून येणार्‍या निवडणुकीत परिणामी ठाणे जिल्हा पुन्हा एकदा भाजपाला काबीज करणे सोपे होईल. त्यामुळे शिवसेनेने वेळीच आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन करत महाविकास आघाडीला सूचक इशारा दिला आहे.

युवक अध्यक्ष आंग्रेला पाठीशी

शिवसेनेत आलेले नवीन गवते यांच्याकडून राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष किशोर उर्फ अन्नू आंग्रे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असून राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा डाव रचला जात असल्याचे आव्हाड म्हणाले. जर गुन्हे दाखल करायचे होते, तर गंभीर गुन्हे दाखल करायचे होते, असे सांगत गुन्हेगारी पार्श्वभूमी असणार्‍या आंग्रे यांना खुद्द मंत्री आव्हाड यांनी पाठीशी घातले आहे.

- Advertisement -

अधिकारी पटनिगीरे कुणाचे?

नवी मुंबई महापालिका निवडणुकीचे वॉर्ड रचना बनवण्याचे काम सध्या सुरू आहे. या कामात पालिका अधिकारी पटनिगीरे रात्री एक वाजता कुण्याच्या बंगल्यावर जातात याचा शोध घेण्याचे सांगत तसेच भाजपाला पूरक अशी प्रभागरचना बनविण्याचे काम सुरू असल्याचे सांगत निवडणूक आयोगाने लक्ष घालण्याची मागणी आव्हाड यांनी केली आहे.


हेही वाचा – लेकीच्या लग्नात मंत्री जितेंद्र आव्हाड झाले भावूक, डोळ्यात आनंदाश्रू!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -