घरताज्या घडामोडीहनुमान चालिसा प्रकरणी राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ, 'तो' दावा पोलिसांनी फेटाळला

हनुमान चालिसा प्रकरणी राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ, ‘तो’ दावा पोलिसांनी फेटाळला

Subscribe

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीबाहेरच्या हनुमान चालीसा पठण प्रकरणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राणा दाम्पत्याविरोधात आमच्याकडे सबळ पुरावे असल्याचे राज्य सरकारने न्यायालयात सांगितले आहे. परंतु आमच्या विरोधातील गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी राणा दाम्पत्याने केली होती, यावर पोलिसांनी सविस्तर उत्तर दिले आहे.

राणा दाम्पत्यांनी दाखल केलेली याचिका खोट्या एफआयआरवर दाखल करण्यात आली होती. हा राणा दाम्पत्याचा दावा पोलिसांनी फेटाळला. शासकीय कर्मचारी साक्षीदार आहेत. सीआरपीसी कलम ३१३ नुसार गुन्ह्याची नोंद झाली आहे, असे पोलिसांना न्यायालयात सांगितले आहे. या प्रकरणी २८ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.

- Advertisement -

खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्यासाठी मुंबई गाठले होते. या दोघांना खार पोलिसांनी ताब्यात घेतले होते. राणा दाम्पत्याने मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केल्यानंतर मुंबईतील वातावरण तणावपूर्ण झाले होते. मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी तळ ठोकला होता. तर खार परिसरातील राणा दाम्पत्याच्या घराबाहेर जमून घोषणाबाजी सुरू केली होती.


हेही वाचा : “उद्धव ठाकरे घरकोंबडा, यापुढे देवेंद्र फडणवीसांबद्दल अपशब्द वापरले तर रस्त्यावर फिरणे मुश्किल करु”

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -