घरमहाराष्ट्रNavneet Rana : लक्ष्मीच्या हाती कमळ असतेच, नवनीत राणांनी भाजपा पक्षश्रेष्ठींचे मानले...

Navneet Rana : लक्ष्मीच्या हाती कमळ असतेच, नवनीत राणांनी भाजपा पक्षश्रेष्ठींचे मानले आभार

Subscribe

2019 च्या लोकसभेत अपक्ष निवडणूक लढलेल्या नवनीत राणा 2024 च्या लोकसभेत मात्र भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढणार आहेत. उमेदवारी जाहीर होताच नवनीत राणा यांनी भाजपा पक्षश्रेष्ठींचे आभार मानले आहेत.

अमरावती : गेल्या बऱ्याच दिवसांपासून सस्पेन्स असलेल्या अमरावती लोकसभेतून भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज (ता. 27 मार्च) भाजपाने लोकसभा उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली असून यामध्ये खासदार नवनीत राणा यांची घोषणा केली आहे. राणा यांना अमरावती लोकसभेतून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता 2019 च्या लोकसभेत अपक्ष निवडणूक लढलेल्या नवनीत राणा 2024 च्या लोकसभेत मात्र भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढणार आहेत. उमेदवारी जाहीर होताच नवनीत राणा यांनी भाजपा पक्षश्रेष्ठींचे आभार मानले आहेत. (Navneet Rana thanked the BJP party leaders after the announcement of candidature)

हेही वाचा… Amravti Lok Sabha : नवनीत राणा कमळ चिन्हावर लढणार, भाजपाची सातवी यादी जाहीर

- Advertisement -

नवनीत राणा यांना भाजपाकडून अमरावती लोकसभेतून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या घरी कार्यकर्त्यांकडून एकच जल्लोष करण्यात आला. यावेळी राणा यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत म्हटले की, मी आधीच सांगितले होते की, लक्ष्मीच्या हाती नेहमी कमळ असतेच. अमरावतीकरांची सून म्हणून गेल्या 12-13 वर्षांपासून काम करत आहे. अमरावतीकरांची देखील हीच इच्छा होती. त्यामुळे भाजपा पक्षश्रेष्ठींचे आभार मानते, असे नवनीत राणा यांच्याकडून सांगण्यात आले.

तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मी माझे नेते मानते. हे मी आधीच सांगितले होते. त्यामुळे या नेत्यांच्या शब्दापुढे जाणार नाही, असे आधीच सांगितले होते. आज दिल्लीतून फोन आल्यानंतर काही वेळातच प्रसार माध्यमांवर मला उमेदवारी मिळाल्याची घोषणा झाली. ज्यामुळे आता अमरावतीकरांच्या तर्फे मी भाजपाच्या सर्व नेत्यांचे आणि पक्षश्रेष्ठींचे आभार मानते. अमरावतीकरांचा आवाज ऐकून, माझ्या कामाला लक्षात घेऊन त्यांनी मला ही उमेदवारी जाहीर केली. ज्यामुळे काम करणाऱ्यांच्या मागे असे नेते असतातच, हे पाहायला मिळाले, असेही नवनीत राणा यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

गेल्या पाच वर्षांमध्ये नवनीत राणा यांनी संसदेत भाजपाला पूरक भूमिका घेतल्याचे फडणवीस यांनी सांगितले होते. त्यामुळे नवनीत राणा यांना भाजपाची उमेदवारी मिळणार, हे जवळपास निश्चित होते. मात्र, त्यांच्या या उमेदवारीला शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांच्याकडून तीव्र विरोध करण्यात आला होता. राजकारण सोडावे लागले तरी चालेल, पण मी नवनीत राणांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका अडसूळ यांच्याकडून घेण्यात आली आहे. तर दुसरीकडे प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सुद्धा राणांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. पण या सर्व विरोधातूनही भाजपाकडून राणांनाच उमेदवारी देण्यात आल्याने यामुळे आता पुढे काय होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -