घरमहाराष्ट्रनागपूरNagpur Constituency : गडकरींविरुद्ध लढणाऱ्या काँग्रेस उमेदवाराची संपत्ती साडेचार वर्षात 63 टक्क्यांनी...

Nagpur Constituency : गडकरींविरुद्ध लढणाऱ्या काँग्रेस उमेदवाराची संपत्ती साडेचार वर्षात 63 टक्क्यांनी वाढली

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. नागपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपा उमेदवार नितीन गडकरी आणि काँग्रेसकडून विकास ठाकरे यांच्यात लढत होणार दोघांना मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर आता विकास ठाकरे यांनी अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रावरून त्यांची संपत्ती वाढल्याचे समोर आले आहे. साडेचार वर्षात विकास ठाकरे यांची संपत्ती तब्बल 63 टक्क्यांनी वाढली आहे. (Nagpur Constituency The wealth of the Congress candidate fighting against Nitin Gadkari increased by 63 percent in four and a half years)

हेही वाचा – Sadabhau Khot : हातकणंगलेमध्ये प्रस्थापित विरुद्ध विस्थापित लढत? सदाभाऊ घेणार फडणवीसांची भेट

- Advertisement -

विकास ठाकरे यांनी 2019 च्या निवडणुकीत अर्ज भरताना दिलेल्या शपथपत्रात त्यांच्या कुटुंबीयांची संपत्ती 6 कोटी 54 लाख 12 हजार 43 रुपये दाखवली होती. तर 2024 मध्ये विकास ठाकरे यांच्या कुटुंबाची संपत्ती 9 कोटी 45 लाख 37 हजार 481 रुपये असल्याचे म्हटले आहे. याचा अर्थ विकास ठाकरे यांची संपत्ती 63 टक्क्यांनी म्हणजे साडेचार वर्षांत 2 कोटी 91 लाख 25 हजार 438 रुपयांनी वाढली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या कर्जाच्या रकमेतही वाढ झाली आहे. 2019 मध्ये 1 कोटी 15 लाख 69 हजार 178 रुपये कर्ज होते. आता हे कर्ज वाढून 2 कोटी 92 लाख 58 हजार 69 रुपये इतके झाले आहे.

विकास ठाकरे यांच्यावर 1 कोटींच कर्ज

शपथपत्रानुसार, विकास ठाकरे यांच्याकडे 121 ग्रॅम सोने आहे. ज्याची किंमत 4 लाख 65 हजार 800 रुपये आहे. तर त्यांच्या पत्नीकडे 413 ग्रॅम सोने आहे. त्याची किंमत 14 लाख 52 हजार रुपये आहे. तसेच वाहन आणि बचत अशी एकूण 1 कोटी 29 लाख 65 हजार 185 रुपयांची चल संपत्ती आहे. तर त्यांच्या पत्नीकडे 1 कोटी 42 लाख 9 हजार 629 रुपयांची चल संपत्ती आहे. याशिवाय विकास ठाकरे यांच्या नावाने 69 लाख 10 हजारांची स्थावर मालमत्ता आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावाने 6 कोटी 66 हजार 71 हजार 67 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. विशेष म्हणजे विकास ठाकरे यांच्यावर 1 कोटी 51 लाख 41 हजार 813 रुपयांचे कर्ज आहे. तर त्यांच्या पत्नीवर 1 कोटी 41 लाख 16 हजार 256 रुपयांचे कर्ज आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Amravti Lok Sabha : नवनीत राणा कमळ चिन्हावर लढणार, भाजपाची सातवी यादी जाहीर

विकास ठाकरे यांच्यावर 20 गुन्हे दाखल

दरम्यान, विकास ठाकरे यांच्यावर 2017 पासून आतापर्यंत विविध कलमांतर्गत 20 गुन्हे दाखल आहेत. अनधिकृतपणे मोर्चा काढणे, शासकीय कामात हस्तपेक्ष करणे, रेल्वेगाडी थांबवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र आजवर एकाही गुन्ह्यात ते दोषी ठरलेले नाहीत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -