घरमहाराष्ट्रSadabhau Khot : हातकणंगलेमध्ये प्रस्थापित विरुद्ध विस्थापित लढत? सदाभाऊ घेणार फडणवीसांची भेट

Sadabhau Khot : हातकणंगलेमध्ये प्रस्थापित विरुद्ध विस्थापित लढत? सदाभाऊ घेणार फडणवीसांची भेट

Subscribe

मुंबई : हातकणंगलेची जागा रयत क्रांती संघटनेला सोडण्याची मागणी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. येथून शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनाच पुन्हा उमेदवारी देण्याच्या हलचाली सुरु आहेत. माने यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र येथे प्रस्थापितांना आणि एकाच घराण्याला वारंवरा संधी दिली गेली तर आमच्यासारखे विस्थापित दुर्लक्षीतच राहाणार असल्याचे खोत यांनी म्हटले आहे. (Established vs Displaced Fight in Hatkanangale Devendra Fadnavis will visit Sadabhau Khot)

हेही वाचा – Kadu VS Rana : नवनीत राणांना निवडणुकीत 100 टक्के पाडणार; बच्चू कडूंचा इशारा 

- Advertisement -

सदाभाऊ खोत यांनी हातकणंगले मतदारसंघात प्रस्थापितांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप केला आहे. मात्र ही जागा आम्हालाच पाहिजे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. 2019 पासून आम्ही ही जागा रयत क्रांती संघटनेला मागत आहोत. मात्र याठिकाणी प्रस्थापितांनाच प्राधान्य दिले जात असल्याने आमच्यासारखे विस्थापित दुर्लक्षीतच राहत आहोत. त्यामुळे आता ही जागा रयत क्रांती संघटना लढवणार आहे, असे सदाभाऊ खोत म्हणाले.

सुरवातीपासूनच प्रस्तापितांच्याविरोधात आमची लढाई सुरू आहे, असे स्पष्ट करताना सदाभाऊ खोत म्हणाले की, आम्ही नेहमी विस्तापितांच्या बाजूनेच राहिलो आहोत. मात्र राजकारणात प्रस्तापित घराणीच आमच्या मानगूटीवर बसत आहेत. त्यामुळे भविष्यात विस्तापित विरुद्ध प्रस्तापित लढाई अधिक तीव्र करणार आहोत. आम्ही महायुतीकडे हातकणंगलेची जागा रयत क्रांती संघटनेला मिळावी, अशी मागणी केली होती. मात्र दुर्देवाने या मागणीचा विचार होताना दिसत नाही, अशी खंत सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

हेही वाचा – ED : पंतप्रधान मोदींचा नवा विचार; ईडीने जप्त केलेला पैसा सामान्यांना कसा परत करता येणार?

सदाभाऊ खोत म्हणाले की, गेल्या लोकसभा निवडणुकीतही आम्ही निवडणूक लढविण्याची सर्व तयारी केली होती. मात्र जागा वाटपात ही जागा शिवसेनेला गेली आणि आम्हाला थांबण्याचा सल्ला देण्यात आला. युतीचा धर्म पाळून आम्ही माघार घेतली आणि प्रचारप्रमुखाची भुमिका बजावून महायुतीचा उमेदवार निवडून आणला. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली. आम्ही पुन्हा रस्त्यावरची लढाई लढत सामान्य जनतेशी नाळ कायम ठेवली.

आता या निवडणुकीत तरी हातकणंगलेची जागा आम्हाला मिळावी अशी मागणी आम्ही महायुतीकडे केली होती. मात्र पुन्हा आम्हाला डावलण्यात येत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आम्ही आता प्रस्तापितांचा प्रचार करणार करणार नाही. कार्यकर्त्यांची बैठक घेवून पुढील भुमिका निश्चीत करू. याशिवाय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून या जागेसंदर्भात चर्चा करू असे सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केले.

हातकणंगलेमध्ये मविआकडून राजू शेट्टी मैदानात?

हातकणंगलेमध्ये महाविकास आघाडीच्यावतीने स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे भेटकही घेतली. शिवसेना ठाकरे गटाच्या चिन्हावर निवडणूक लढण्यास त्यांनी नकार दिला, मात्र महाविकास आघाडीने आम्हाला पाठिंबा द्यावा अशी मागणी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -