घरताज्या घडामोडीसंसदेत महिला सदस्यांचा अपमान, लोकशाहीत अशी घटना अयोग्य असल्याचे नवाब मलिक यांचं...

संसदेत महिला सदस्यांचा अपमान, लोकशाहीत अशी घटना अयोग्य असल्याचे नवाब मलिक यांचं वक्तव्य

Subscribe

केंद्र सरकारची उत्तर देण्याची इच्छा नव्हती म्हणून या विषयांवर चर्चा न करता सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आलं

संसदीय अधिवेशनादरम्यान सभागृहात पुरुष मार्शलने महिला सदस्यांसोबत धक्काबुक्की केली आहे. महिला सदस्यांचा अपमान झाला असून लोकशाहीत अशा घटना योग्य नसल्याचे राष्ट्रवादी नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपतींनी तसेच लोकसभा अध्यक्षांनी या घटनेबाबत चिंता व्यक्त केली आहे. परंतू राष्ट्रपतींनी याबाबत केंद्र सरकारला विचारणा केली पाहिजे होती. राजकीय दबावामुळे राष्ट्रपतींनी तसे केले नसेल असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. केंद्र सरकारला शेतकरी प्रश्न, पेगॅसस प्रकरणावर विरोधकांना उत्तर द्यायचे नव्हते यामुळे केंद्र सरकारने अधिवेशन स्थगित केलं असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

संसदेत झालेल्या गदारोळावर राष्ट्रवादी नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली आहे. संसदेत महिला सदस्यांना धक्काबुक्की करण्यात आला हा प्रकार अशोभनीय आहे. महिला सदस्यांसोबत पुरुष मार्शलने बलाचा वापर केल आहे. यामुळं महिला सदस्यांचा अपमान झाला असून लोकशाहीत अशा प्रकारच्या घटना योग्य नाही. संसदेत घडलेल्या प्रकाराबाबत राष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्ष यांनी चिंता व्यक्त केली आहे. मात्र राष्ट्रपतींनी याबाबत केंद्र सरकारला जाब विचारण्याची गरज होती. मात्र राष्ट्रपतींनी राजकीय दबावामुळे असे केलं नसावे असे वक्तव्य नवाब मलिक यांनी केलं आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारला संसदेत उत्तर द्यायचे नव्हतं असं त्यांच्या वागणूकीवरुन दिसत आहे. पेगॅसस हेरगिरी प्रकरण, आंदोलनकारी शेतकऱ्यांना न्याय देण्याचा विषय, तसेच जातीनिहाय जनगणना अशा सर्व विषयांवर केंद्र सरकारला चर्चा आणि उत्तर द्यायचे नव्हते. केंद्र सरकारची उत्तर देण्याची इच्छा नव्हती म्हणून या विषयांवर चर्चा न करता सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

संसदेचे पावसाळी अधिवेशनादरम्यान बुधवारी विमा विधेयक चर्चेला मांडलं गेलं, या विधेयकाला विरोधकांनी जोरदार विरोध करत संताप व्यक्त केला. शरद पवार आणि मल्लिकार्जून खरगेनी सभागृहात विधेयकाला विरोध दर्शवत निषेध केला होता. तसेच शिवसेना खासदारांसह इतर खासदारही सभागृहातील वेलमध्ये उतरले आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झालं. यामुळे बाहेरून महिला आणि पुरुष मार्शलला बोलवण्यात आलं. या मार्शलने महिला सदस्यांसोबत धक्काबुक्की केल्यामुळे विरोधक आक्रमक झाले यामुळे सभागृहातील वातावरण चांगलंच तापले होते. या सर्व कृतीचा विरोधकांनी निषेध केला असून काँग्रेसकडून केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्यात आलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -