घरमहाराष्ट्रसुप्रिया सुळेंविषयी आक्षेपार्ह कमेंट; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ट्रोलरला चोपले

सुप्रिया सुळेंविषयी आक्षेपार्ह कमेंट; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ट्रोलरला चोपले

Subscribe

मनसे, वंचित नंतर आता राष्ट्रवादीनेही ट्रोलर्सला चोपले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्रोलर्सना लावारीस पोरं अशी उपमा देऊन ट्रोल करणाऱ्यांना घरी जाऊन झोडा असं सांगितलं होतं. त्यानंतर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील आपल्यावर टीका करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर द्या, असे सांगितले होते. राष्ट्रवादीकडून मात्र कोणत्याही नेत्याने ट्रोलर्सला काय उत्तर द्यावे, याबाबत कधीच जाहीर वक्तव्य केलेले नाही. मात्र तरिही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांची नाहक बदनामी करणाऱ्या ट्रोलर्सचा समाचार घेण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी एका वृत्तवाहिनीच्या फेसबुक पेजवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या अक्षय तांबवेकर या तरुणाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घरी जाऊन चोपले आहे. ईव्हीएम विषयी भूमिका व्यक्त केल्यानंतर त्याची बातमी एका वृत्तवाहिनीच्या पेजवर टाकण्यात आली होती. त्यानंतर त्याखाली सदर तरुणाने आक्षेपार्ह कमेंट केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याचे घर शोधून त्यांच्या पालकासमोरच त्याला चांगलेच धुतले.

- Advertisement -
ncp workers beat trollers
कमेंट करणाऱ्या तरूणाचा माफीनामा

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी सदर तरूणाकडून माफीनामाही लिहून घेतला आहे. तसेच व्हिडिओ काढत त्याला आपल्या चुकीचा पश्चाताप व्यक्त करायला भाग पाडले आहे. संबंधित तरूण कोणत्या पक्षाचा आहे? याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र भाजपने या तरूणाची बाजू उचलून धरली आहे. भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करून “घरात घुसून ठोकून काढीन” सुप्रिया सुळे आपल्या शब्दाला जागल्या. बोले तैसा चाले..’ असा मजकूर लिहून तरूणाला चोप दिल्याची बातमी शेअर करण्यात आली आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रसिद्ध चारोळीकार चंद्रशेखर गोखले यांनाही असेच जेरीस आणले होते. गोखले यांनी देखील एका वृत्तवाहिन्याच्या फेसबुक पेजवर शरद पवारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गोखलेंना जिवंतपणेच श्रद्धांजली वाहिली होती. त्यानंतर मात्र गोखलेंनी देखील फेसबुकवर जाहीर माफी मागितली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -