घरमहाराष्ट्रपुण्यात ठरलं! काँग्रेस-३, राष्ट्रवादी -४; एक जागा मनसेला?

पुण्यात ठरलं! काँग्रेस-३, राष्ट्रवादी -४; एक जागा मनसेला?

Subscribe

पुण्याची कोथरूड विधानसभेची जागा राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीकडून मनसेला दिली जाईल, अशी चर्चा सुरु आहे.

काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपात पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी हडपसर, खडकवासला, पर्वती, वडगावशेरी हे चार मतदारसंघ राष्ट्रवादीकडे तर, शिवाजी नगर, कॅन्टोन्मेंट आणि कसबा हे तीन मतदारसंघ काँग्रेसला देण्यात आले आहेत. तसेच कोथरूड विधानसभा मित्र पक्षाला दिला जाईल, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे जाहीर केले. मात्र कोथरूड विधानसभेची जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दिली जाईल, अशी चर्चा आहे.

हेही वाचा – शरद पवार यांचा उदयनराजेंना टोला; ‘हे वागणं बरं नव्हं’

- Advertisement -

पुणे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अजित पवार यांनी जागा वाटपाचा तपशील जाहीर करतानाच एका जागेविषयीची संभ्रम कायम ठेवला आहे. अजित पवार यांनी चार मतदारसंघांची नावे जाहीर करताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या चार विधानसभा मतदारसंघापैकी खडकवासला मतदारसंघ हा बारामती लोकसभा मतदारसंघात आणि हडपसर विधानसभा मतदारसंघ हा शिरुर लोकसभा मतदार संघात आहे. पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील पर्वती आणि वडगांव शेरी हे दोन विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आले आहेत. या चारपैकी वडगांवशेरी ही जागा २००९ साली राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकली होती. उर्वरीत तीनही विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला विजय मिळविता आलेला नाही. हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद असली तरी अंतर्गत गटबाजीमुळे येथे विजय मिळाला नाही.

कोथरुडची जागा मनसेसाठी?

काँग्रेसला शिवाजी नगर, कसबा आणि पुणे कॅन्टोन्मेंट हे विधानसभा मतदारसंघ मिळाले असून, यामध्ये शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट हे मतदार संघ २००९ साली काँग्रेसने जिंकले होते. तर कसबा विधानसभा मतदारसंघांत त्यांना अद्याप यश मिळालेले नाही. कोथरुड विधानसभा मतदार संघ हा काँग्रेस आघाडीकडून मित्र पक्षांकरीता सोडला जाणार आहे. या जागेवर काँग्रेस आघाडीकडून मनसेला मदत केली जाऊ शकते. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ले असणार्‍या मतदारसंघातील उमेदवारांची यादी पक्षाकडून लवकरच जाहीर केली जाईल. परंतु, काही मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा ही भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतरच केली जाणार आहे, असेही पवार यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -