घरमहाराष्ट्रराष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ठरले! ५ विद्यमान खासदारांना संधी!

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ठरले! ५ विद्यमान खासदारांना संधी!

Subscribe

आगामी लोकसभ निवडणुकांसाठी काँग्रेसपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसचीही उमेदवारांची यादी निश्चित झाली असून ११ जागांवरील संभाव्य उमेदवारांची नावं समोर आली आहेत.

येणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातल्या आघाडीवर शिक्कामोर्तब झालं असून आता या दोन्ही पक्षांकडून कुणाला उमेदवारी दिली जाणार आहे, यावर देखील शिक्कामोर्तब होऊ लागले आहे. काँग्रेसचे महाराष्ट्राती प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या २६ मतदारसंघातल्या संभाव्य उमेदवारांची यादी दिल्लीला पाठवल्याचं मंगळवारी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील ११ मतदारसंघांमधल्या उमेदवारांची यादी निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही यादी समोर आली असून त्यामध्ये ५ विद्यमान खासदारांना संधी देण्यात आली आहे. राजू शेट्टींना हातकणंगलेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्याशिवाय बारामतीमधून सुप्रिया सुळे, कोल्हापुरातून धनंजय महाडिक, साताऱ्यातून उदयनराजे भोसले आणि गोंदियातून मधुकर कुकडेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

  • बारामती – सुप्रिया सुळे
  • कोल्हापूर – धनंजय महाडिक
  • सातारा – उदयनराजे भोसले
  • माढा – विजयसिंह मोहिते-पाटील
  • रायगड – सुनील तटकरे
  • बुलढाणा – राजेंद्र सिंगणे 
  • नाशिक – समीर भुजबळ
  • ठाणे – संजीव नाईक 
  • उस्मानाबाद – अर्चना पाटील/राणा जगजित 
  • ईशान्य मुंबई – संजय दीना पाटील
  • हातकणंगले – राजू शेट्टी
  • गोंदिया – वर्षा पटेल/मधुकर कुकडे

काँग्रेसच्या यादीमध्ये कुणाचा समावेश?

दरम्यान, मंगळवारी मुंबईत काँग्रेसच्या संसदीय समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्यातल्या एकूण २६ मतदारसंघांमधल्या संभाव्य उमेदवारांची यादी तयार करण्यात आली. ही यादी दिल्लीला पाठवण्यात आली असून प्रसंगी गरज पडल्यास काही नावं बदलण्याची तयारी देखील पक्षाची आहे. त्यामुळे या यादीतल्या समाविष्ट उमेदवारांनी सध्या देव पाण्यात ठेवले आहेत. कारण कुणाच्याही नावावर फुली मारली जाण्याची शक्यता आहे. मात्र, ‘निवडून येण्याच्या निकषांवरच अंतिम नावं ठरवली जातील’, असं आश्वासन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिल्यामुळे यातलं कोण राहणार? आणि कोण जाणार? अशा बुचकळ्यात सर्वच उमेदवार पडले आहेत. दरम्यान, या यादीमध्ये कुणाचा समावेश करण्यात आला आहे? याविषयी कमालीची गुप्तता पाळली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -