घरमहाराष्ट्रशरद पवार तिवरे धरण दुर्घटनास्थळाला भेट देणार

शरद पवार तिवरे धरण दुर्घटनास्थळाला भेट देणार

Subscribe

तिवरे धरण फुटल्यामुळे आतापर्यंत २३ जणांचा बळी गेला आहे. सत्ताधारी कंत्राटदाराला वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला जात आहे.

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणाच्या दुर्घटनास्थळाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे ८ जुलै रोजी भेट देणार आहेत. तिवरे धरण फुटल्याने यामध्ये २३ जणांचा बळी गेला आहे. धरण फुटीनंतर संबंधित अधिकारी आणि शिवसेना आमदार सदानंद चव्हाण यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सर्वच स्तरातून करण्यात आली होती. दरम्यान या दुर्घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे ८ जुलै रोजी दुपारी १२ वाजता तिवरे धरणाची पाहणी करून मृतांच्या नातेवाईकांची भेट घेणार आहेत.

महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ३ जुलै रोजी तिवरे धरण फुटले होते. आतापर्यंत २३ लोकांचे मृतदेह सापडले असून अजूनही काही लोकांचा तपास सुरु आहे. धरण फुटल्यानंतर कंत्राटदार असलेल्या शिवसेनेच्या आमदारावर टीका करावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. मात्र सत्ताधारी शिवसेनेचे मंत्री आपल्या आमदाराला वाचिवण्यासाठी खेकड्यांमुळे धरण फुटले, असे वक्तव्य करत आहेत. जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी खेकड्याचा उल्लेख केल्यानंतर सोशल मीडियावर मात्र त्यांची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे.

- Advertisement -

हे वाचा – तिवरे धरणात सापडला डायनॉसॉर ‘खेकडा’? वाचा काय आहे रहस्य

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे ७ जुलै ते ८ जुलैपर्यंत पुणे, सातारा आणि रत्नागिरी जिल्हयाच्या दौर्‍यावर असून पुणे येथील साखर कारखान्याच्या सेमीनारला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे गावाला भेट देणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -