घरताज्या घडामोडीशिवरायांच्या पुतळ्याची विटंबना हा राष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला, राष्ट्रवादीचा तीव्र शब्दात निषेध

शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना हा राष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला, राष्ट्रवादीचा तीव्र शब्दात निषेध

Subscribe

बंगळूरुमध्ये छत्रपती शिवाजी माहाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा व्हिडिओ तरुणांकडून व्हायरल झाला आहे. या व्हिडिओचे पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तसेच नेत्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशवासियांच्या भावना आणि अस्मितेवर हल्ला करण्यात आलाय अशा तीव्र शब्दात निषेध केला आहे. मुख्यमंत्र्यांकडूनही या घटनेचा निषेध करण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्नाटकातील पुतळ्याची विटंबना केल्याच्या घटनेवर तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. अजित पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी अशा कुठल्याच घटनेने जराही कमी होणार नाही, मात्र अशा घटनांना संरक्षण देणाऱ्यांना देश माफ करणार नाही,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्नाटकातील बंगळुरु शहरात झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबना घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत त्या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत, देशाची अस्मिता आहेत. सर्वपक्षीय राज्यकर्त्यांसाठी आदर्श आहेत. कर्नाटकातील बंगळुरु शहरात त्यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार हा देशवासियांच्या भावना आणि राष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला आहे. पुतळा विटंबनेच्या या घटनेबद्दल महाराष्ट्रासह समस्त देशवासियांच्या भावना अत्यंत तीव्र असून या घटनेचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र शब्दात निषेध केला. कर्नाटक सरकार आणि केंद्रसरकारने या घटनेकडे गांभीर्यानं पहावे, दोषींना शोधून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

हा प्रकार अत्यंत संताप आणणारा – जयंत पाटील

संपूर्ण भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी बंगळूर येथे विटंबना केल्याचे समजले. हा प्रकार अत्यंत संताप आणणारा आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे या घटनेचा तीव्र निषेध करतो. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमची अस्मिता आहे. आमच्या अस्मितेचा कोणी अपमान करत असेल तर आम्ही हे कदापि सहन करणार नाही. कर्नाटक सरकारने या समाजकंटकांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

शिवप्रेमींनी हिंसक प्रतिक्रिया देऊ नये – वळसे-पाटील

बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना दुर्दैवी असून मी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अहमदनगर येथे छत्रपतींच्या भूमीत आल्याचा आनंद व्यक्त केला. आता त्यांनी कर्नाटक सरकारला या नींदनीय घटनेतील आरोपींवर तातडीने कारवाई करून कठोर शासन करण्याचे आदेश द्यावेत. कर्नाटक राज्यासहीत महाराष्ट्रातही काही ठिकाणी या घटनेचे पडसाद उमटले आहेत. तसेच शिवप्रेमींनी हिंसक प्रतिक्रिया देऊ नये असे आवाहन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.

विकृत मनोवृत्तीचा बीमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी लक्ष घालावे – मुख्यमंत्री

बंगळुरूमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विटंबना प्रकरण अतिशय निंदनीय असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या घटनेबाबत निषेध व्यक्त केला आहे. तसेच कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या हिणकस, विकृत मनोवृत्तीचा बीमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी स्वतः लक्ष घालून तेथील राज्य शासनाला त्वरित संबंधितांवर कडक कारवाई करण्यास सांगावे, अशा तीव्र शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भावना व्यक्त केली आहे.


हेही वाचा : ‘पिवळ्या ध्वजाचं स्तोम बंद करा’ महाराष्ट्र शांत बसणार नाही, कर्नाटक सरकारला एकनाथ शिंदेंचा इशारा


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -