घरताज्या घडामोडीनागपूरमधील 'रस्त्यांची रांगोळी' म्हणत राष्ट्रवादीने देवेंद्र फडणवीसांना लगावला टोला

नागपूरमधील ‘रस्त्यांची रांगोळी’ म्हणत राष्ट्रवादीने देवेंद्र फडणवीसांना लगावला टोला

Subscribe

खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडली आहेत. ट्विटरवर नागपूरमधील खड्ड्यांचे फोटो शेअर करत फडणवीस यांच्यावर टीका केली.

राज्याच्या अनेक भागांतील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या खड्ड्यांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यभरात या खड्ड्यांमुळे आंदोलनेही करण्यात आलीत. मात्र अद्याप रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आलेले नाहीत. या खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडली आहेत. ट्विटरवर नागपूरमधील खड्ड्यांचे फोटो शेअर करत फडणवीस यांच्यावर टीका केली. (NCP taunts Devendra Fadnavis by calling it road rangoli in Nagpur)

राष्ट्रवादी कॉंग्रेसने ट्विटरवर फोटो शेअर करत फडणवीसांना टोला लगावला आहे. “देवेंद्र फडणवीस यांच्या होमग्राऊंड असलेल्या नागपूरमधील ‘रस्त्यांची रांगोळी’ म्हणत राष्ट्रवादीने फडणवीसांना टोला लगावला आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्वीटर पेजवर नागपूरमधील खड्ड्यांची दुरावस्था झालेला एक फोटो शेअर करुन मुंबईच्या खड्ड्यांची चर्चा करता मग याही खड्डयांबाबत बोला अशी विचारणा करण्यात आली आहे. याशिवाय, मुंबई खड्ड्यांबाबत मुख्यमंत्री योजना जाहीर करतात मग फडणवीसांच्या नागपूरकडे का दुर्लक्ष करता असा सवालही राष्ट्रवादीने ट्वीटच्या माध्यमातून केला आहे.

नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासंदर्भात मुंबई आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मुंबईतील येत्या काळात सर्व रस्ते कॉंक्रिटचे होणार, साडेचार हजार कोटींचे रस्ते नव्याने बांधणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. याशिवाय, झोपडपट्टी मुक्त करण्यासह मेट्रोचे जाळे बांधणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदेंनी केली.

- Advertisement -

हेही वाचा – काँग्रेस अध्यक्षपदासाठी उद्या निवडणूक, राज्यभरतील 561 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -