घरमहाराष्ट्रपुतण्याकडून चुलता-चुलतीची दगडाने ठेचून हत्या

पुतण्याकडून चुलता-चुलतीची दगडाने ठेचून हत्या

Subscribe

माथेफिरू पुतण्याने चुलत काका आणि चुतलीचा दगडाने ठेचून हत्या केला. आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

व्हेळ-सडेवाडी (ता. लांजा) येथील माथेफिरू पुतण्याने चुलत काका आणि चुतलीचा दगडाने ठेचून हत्या केला. आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने तालुका हादरून गेला आहे. याबाबत लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत मृत्युमुखी पडलेले एकनाथ शिगम (५५) आणि त्यांची पत्नी वनिता शिगम (५०) हे मुलगी तनुजा शिगम (१९) हिच्यासह व्हेळ सडेवाडी येथे सामायिक घरात राहतात. एका बाजूला ते तर दुसऱ्या बाजूला त्यांचा पुतण्या प्रतीक हा एकटाच राहतो. प्रतीकची आई स्वर्गवासी झाली असून त्याचे वडील चंद्रकांत यांनी दुसरे लग्न केले आहे. ते नोकरीनिमित्ताने मुंबईला राहतात. प्रतीक देखील त्यांच्यासोबत मुंबईला राहत होता. मात्र दीड वर्षापूर्वी तो गावी आला होता. त्यानंतर तो सामायिक घरातील एका खोलीत एकटाच राहत होता. घटनेत मृत्युमुखी पडलेल्या एकनाथ यांना तीन मुली व एक मुलगा असून दोन मुलींचे लग्न झाले आहे. मुलगा नोकरीनिमित्ताने कोल्हापूरला राहतो. मुलगी तनुजा वाटूळ येथील एका खासगी दवाखान्यात नोकरी करते.

काय आहे पार्श्वभूमी

प्रतीक फारसे काम करत नसे. कधीतरी मजुरी करत असे. घरात मोठ्या आवाजा टेपरेकॉर्डरवर गाणी लावून, तर कधीकधी रात्री-अपरात्री आरडाओरडा करून चुलते-चुलतीला त्रास देत असे. याबाबत एकनाथ शिगम व वनिता शिगम यांनी त्याला वेळोवेळी समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने कधी दाद दिली नाही. या त्रासाला कंटाळलेल्या एकनाथ यांनी आपल्या चुलतभावाला म्हणजे प्रतीकचे वडील चंद्रकांत यांना दूरध्वनीवरून मुलाला मुंबईला घेऊन जायला सांगितले होते. मात्र त्यांनी त्याण्याकडे दुर्लक्ष केले होते.

- Advertisement -

असा केला तपास

सकाळी नेहमीप्रमाणे एकनाथ शिगम गुरे घेऊन रानात गेले होते. साडेदहाच्या सुमारास घरी आल्यानंतर घराच्या पाठीमागील गोठ्यात ते गुरांना पाणी पाजत होते. तेव्हा प्रतीकने अचानक त्यांच्यावर हल्ला चढविला. आधी मारहाण करून त्यांना खाली पाडले आणि त्यानंतर त्यांच्या डोक्यात दगड घातला. त्यांचा आरडाओरडा ऐकून वनिता शिगम गोठ्याजवळ आल्या असता प्रतीकने त्यांच्यावरही हल्ला चढवून डोक्यात दगड घातला. त्यामुळे दोघेही जागीच मरण पावले. खून केल्यानंतर प्रतीक जवळच असलेल्या व्हेळ हायस्कूलजवळ आले. तेथील शाळेच्या शिक्षकाजवळ, तसेच पानाच्या टपरीचालकाकडे ५० रुपयांची मागणी केली. मात्र त्याच्या शर्टावर रक्ताचे डाग पाहिल्यानंतर त्यांनी पैसे द्यायला नकार दिला. त्यानंतर प्रतीक सुमारे ५ किमी अंतर चालत व्हेळ फाट्यावर आला आणि वाघणगावकडे निघाला. मात्र खून करून पळून जाताना त्याला त्याच्या वाडीतील रामचंद्र धावडे यांनी पाहिले होते. त्यांनी त्याची माहिती वाडीतील तरुणांना दिली. त्यानंतर प्रकाश रामाणे, महेश शिगम, अनंत बुर्टे, चंद्रकांत गाडे या तरुणांनी त्याला पकडले. आरगाव पोलीस पाटील खामकर यांनी या घटनेची माहिती लांजा पोलिसांना दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव पाटील, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासणे, लांजाचे प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल गंभीर, उपनिरीक्षक पंडित पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रतीक शिगमला अटक केली. चुलता-चुलतीसह त्याला चुलतबहिणीचाही खून करून मुंबईला जायचे होते, असे त्यांना पोलिसांना चौकशीत सांगितले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -