घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रभाच्याने घेतला मामा-मामीचा जीव; कुर्‍हाडीने वार करून संपवले वृद्ध दाम्पत्य

भाच्याने घेतला मामा-मामीचा जीव; कुर्‍हाडीने वार करून संपवले वृद्ध दाम्पत्य

Subscribe

नाशिक : सटाणा तालुक्यातील वेरूळे गावातील उंबरदरी वस्तीत राहणार्‍या मामा-मामीची भाच्यानेच हत्या केल्याची घटना उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. कुर्‍हाडीने वार करून नराधम भाच्याने वृद्ध दांपत्याला संपवले आहे. ९० वर्षीय नारायण मोहन कोल्हे आणि ८५ वर्षीय पत्नी सखूबाई नारायण कोल्हे यांची त्यांचाच भाचा संशयित रामदास भोये यानेच त्यांचा खून केल्याच शनिवारी (दी.३) सकाळी पोलीस तपासात उघड झाले आहे.

पोलिसांंनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्ध दामपत्याचा मुलगा अमरचंद नारायण कोल्हे डोंगरदेवाचा उत्सव सुरू असल्याने गावी आले होते. त्यावेळी वेरूळे यथील उंबरदरी शेतवस्तीत राहणार्‍या वृद्ध आई वडिलांना भेटण्यासाठी तसेच त्यांनाही उत्सवात घेऊन जाण्यासाठी घरी पोहचले. सकाळच्या सुमारास घरी गेले असता त्यांना त्यांच्या आईचा मृतदेह घराबाहेर तर वडिलांचा मृतदेह घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याचे दिसले. हे सगळं दृश्य बघून घाबरलेल्या अमरचंद यांनी गावकर्‍यांच्या मदतीने याबाबत आभोणा पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत तपासाला सुरवात केली.

- Advertisement -

घटनेच्या तपासासाठी आभोणा पोलिसांनी श्वान पथक आणि ठसे तज्ञ यांना पाचारण केले. ही दोन्हीही पथक दुपारी दाखल झाल्यानंतर तपासाला गती आली. श्वान पथकातील श्वानाने काही वेळातच घटनास्थळापासून काहीच अंतरावर गुन्ह्यात वापरलेली कुर्‍हाड शोधली. त्यानंतर कुर्‍हाडीच्या सहाय्याने घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतरावर शेतामध्ये फिरत असलेल्या संशयित रामदास भोये याकडे श्वान पथकातील श्वानाने निर्देशित केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. अटक केलेला संशयित रामदास भोये हा कोल्हे दांपत्याचा भाचा आहे. त्याने हा खून का केला याबाबत अधिक तपस आभोणा पोलीस करीत आहेत.

अश्या निर्घृणपणे वयोवृद्ध दांपत्याची हत्या करण्यात आल्याने तसेच त्यांच्याच नात्यातील इसमाने ती केल्याने कसमादे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच हळहळही व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी घटनास्थळी भेट देत आढावा घेत तपास पथकाला सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -