घरताज्या घडामोडीराज्यात 810 नवे कोरोना रुग्ण, 5 जणांचा मृत्यू

राज्यात 810 नवे कोरोना रुग्ण, 5 जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या आराखड्यात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार होत आहेत. तसेच, रुग्णवाढीमुळे काळजी घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासन आणि सरकारकडून केले जात आहे. अशातच आज राज्यात 810 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे.

राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या आराखड्यात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार होत आहेत. तसेच, रुग्णवाढीमुळे काळजी घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासन आणि सरकारकडून केले जात आहे. अशातच आज राज्यात 810 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तसेच, 5 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून, मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला आहे. (new 810 corona patients in maharashtra)

राज्यात दिवसभरात एकूण 1012 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत राज्यामध्ये 79,37, 588 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.03 टक्के इतके झाले आहे.

- Advertisement -

याशिवाय, राज्यात एकूण 11472 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 4728 इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 2586 सक्रिय रुग्ण आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नव्याने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 9 हजार 206 रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत. रविवारी दिवसभरात देशात 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह भारतात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 5 लाख 27 हजार 597 वर पोहोचली आहे.

- Advertisement -

शनिवारच्या तुलनेतही रविवारी कोरोनाबाधितांची संख्या घटली आहे. देशात शनिवारी दिवसभरात 9 हजार 436 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. तर रविवारी 7 हजार 591 रुग्ण आढळले. कोरोना रुग्णसंख्येत 1 हजार 845 रुग्णांची घट झाली आहे.


हेही वाचा – मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत होणार मेट्रो 3ची उद्या ट्रायल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -