घरताज्या घडामोडीमुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत होणार मेट्रो 3ची उद्या ट्रायल

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत होणार मेट्रो 3ची उद्या ट्रायल

Subscribe

कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गावरच्या मेट्रो 3 ची ट्राल होणार आहे. मंगळवारी ही ट्रायल होणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गावरील मेट्रो-3 चे मे 2021 अखेर पर्यंत भुयारीकरणाचे काम 96 टक्के पूर्ण झाले आहे.

कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गावरच्या मेट्रो 3 ची ट्राल होणार आहे. मंगळवारी ही ट्रायल होणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गावरील मेट्रो-3 चे मे 2021 अखेर पर्यंत भुयारीकरणाचे काम 96 टक्के पूर्ण झाले आहे. आरेच्या सारीपुत नगर येथील ट्रॅकवरती ही चाचणी होणार आहे. (metro 3 trial tomorrow the test will be conducted in the presence of cm eknath shinde and dcm devendra Fadnvis)

कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गावरील मेट्रो-3 चे भुयारीकरणाचे काम मे 2021 अखेरपर्यंत 96 टक्के पूर्ण झाले आहे. या मेट्रो 3 च्या एकूण प्रकल्पाचे काम 67 टक्के झाले आहे. दरम्यान, या मेट्रो मार्गाच्या कारशेडबाबत अध्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे मेट्रो-3 चे भवितव्य अंधारातच आहे. कारशेड निर्णयाच्या विलंबामुळे मेट्रो-3 ची मुदत साधारण दोन-तीन वर्षे पुढे जाण्याची भीती वर्तवली जात आहे.

- Advertisement -

आरे कारशेडला पर्यावरणवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. हा विरोध असतानाच ट्रायल सुरु करण्यात आली आहे. तसेच, या मेट्रोसाठी दोन रॅक मुंबईत दाखल झाले आहेत. सकाळी 11 वाजता ही आरेच्या सारीपुत नगर येथील ट्रॅकवरती ही चाचणी होणार आहे.

आरेतील मेट्रो 3 चे कारशेड कांजूरमार्ग इथं हलवण्याचा निर्णय होताच केंद्र सरकारनंही कांजूरमार्गच्या या जागेवर स्वतःचा मालकी हक्क दाखवला होता. सदर जागा ही मिठागराची असल्यामुळे त्यावर केंद्राचा अधिकार आहे असं नमूद करून त्यावर कोणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई केली जाईल असा बोर्ड लावला होता.

- Advertisement -

दरम्यान. आरेतील झाले मेट्रो कारशेडसाठी कापली जाणार असल्याचा दावा कॉग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी केला होता. कांजुरमार्गची जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा यांचा प्रयत्न असल्याचाही आरोप भाई जगताप यांनी पावसाळी अधिवेशनात केला.


हेही वाचा –  एसी लोकल बंद केल्या पाहिजेत; रेल्वे प्रशासनाच्या निर्णयावर शरद पवार आक्रमक

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -