घरमहाराष्ट्रचंद्रशेखर आझाद : कोरेगाव भीमाच्या गर्दीचा हिरो

चंद्रशेखर आझाद : कोरेगाव भीमाच्या गर्दीचा हिरो

Subscribe

कोरेगाव भीमा येथील लढाईला २०१ वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने लाखो भीमअनुयायी पेरणे गावातील विजयस्तंभाला सलामी देण्यासाठी आले होते. पण, यावेळी खरा हिरो ठरला तो चंद्रशेखर आझाद.

कोरेगाव भीमा येथील लढाईला २०१ वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने लाखो भीम अनुयायी पेरणे गावातील विजयस्तंभाला सलामी देण्यासाठी आले होते. यावेळी तरुणांचे जत्थेच्या जत्थे विजयस्तंभाला सलामी देण्यासाठी धडकत होते. अनेक राजकीय पक्षांचे नेते आणि मंत्र्यांनी देखील विजयस्तंभाला भेट दिली. मात्र या सर्वांमध्ये भाव खाऊन गेला तो भीम आर्मीचा संस्थापक चंद्रशेखर आझाद. चंद्रशेखर आझाद दुपारनंतर पुण्याहून कोरेगाव भीमाच्या दिशेने निघाला. दुपारी चारच्या सुमारास तो कोरेगाव भीमापासून ८ किमी अंतरावर असलेल्या लोणीकंद या गावी पोहोचला. त्यावेळी या आठ किलोमीटरच्या अंतरावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी भीम अनुयायी मोठ्या संख्येने कोरेगाव भीमाच्या दिशेने जात होते. त्यामुळे वाहतुकीचा चांगलाच खोळंबा झाला होता. लोक गाड्यांच्या ताफ्यातून वाट काढत काढत विजयस्तंभाच्या दिशेने जात होते.

चंद्रशेखर आझाद देखील यावेळी ट्राफिकमध्येच होता. पजेरो गाडीच्या छतावर बसून तो सर्वांना अभिवादन करत होता. यावेळी अनेक तरुणांनी त्याच्यासोबत सेल्फी काढायला एकच गर्दी केली. कोरेगाव भीमाला राज्यभरातून लाखो भीम अनुयायी स्वंय प्रेरणेने येतात. या गर्दीला कोणताही एक नेता नसतो. मात्र अशा गर्दीला चंद्रशेखरच्या रुपाने आयताच नेता मिळाल्याचे पाहायला मिळत होते. तरुणांचे ग्रुप घोषणाबाजी करत करत चंद्रशेखरच्या ताफ्यासोबत चालू लागले होते. तसेच चंद्रशेखरचा आवेश पाहून तरुणांनीही जोरदार घोषणाबाजी सुरु केली होती.

- Advertisement -

वाचा – भीमा कोरेगाव : शूरविरांना मानवंदना

चंद्रशेखर आझादला महाराष्ट्रात आल्यापासून पोलिसांनी नजरकैदेत ठेवले होते. तरीही मी विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येणारच अशी भूमिका त्याने घेतली होती. तेव्हापासूनच आंबेडकरी विचारांच्या तरुणांमध्ये चंद्रशेखर प्रसिद्ध झाला. उत्तर प्रदेशमध्ये चंद्रशेखर आझादचे अनेक कार्यकर्ते आहेत. कोणत्याही पक्ष किंवा संघटनेशी संबंध नसलेल्या महाराष्ट्रातील तरुणांना त्याच्यारुपाने नेता मिळाला, असे चित्र इथे दिसत होते.

दरवर्षी कोरेगाव भीमाला येणार – आझाद

सरकारला हे माहिती नाही, की हा देश त्यांच्या मर्जीने नाही तर संविधानानुसार चालतो. मी भीमा कोरेगावला येऊ नये म्हणून मला नजरकैदेत ठेवले गेले. मात्र आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार चालतो. सरकारची हिमंत नाही की, ते बाबासाहेबांच्या लेकरांना अडवू शकतील.

- Advertisement -

बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते की, विजयस्तंभाला येऊन प्रेरणा घ्या. मी ही लोकांना तेच सांगतोय. आज लाखो लोक इथे आलेले पाहायला मिळत आहेत. चंद्रशेखर आता दरवर्षी कोरेगाव भीमाला येणार, अशी प्रतिक्रिया भीम आर्मीचा संस्थापक चंद्रशेखर आझाद याने ‘माय महानगर’शी बोलताना दिली.

वाचा – कोरेगाव-भिमाकडे येणाऱ्या भीम अनुयायांना टोलमाफी

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -