घरदेश-विदेश'ही एक विनाशकारी घटना'

‘ही एक विनाशकारी घटना’

Subscribe

शबरीमाला मंदिरात दोन महिलांनी प्रवेश केला आहे. या प्रवेशावर भाजपने नाराजी व्यक्त केली आहे. भाजने ही एक विनाशकारक घटना असल्याचे म्हटले आहे.

बुधवारी सकाळी केरळच्या शबरीमाला मंदिरात दोन महिलांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे या मंदिरात प्रवेश करुन या दोन महिलांनी एतिहासीक परंपरा मोडली आहे. गेल्या शेकडो वर्षांपासून या मंदिरात १० ते ५० वयोगटातील महिलांना प्रवेशबंदी होती. पंरतु, सर्वोच्च न्यायालयाने सर्व वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश देण्याचे आदेश दिले होते. त्यांनतर मंदिर परिसरात मोठा गदारोळ झाला. भाविकांकडून महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता. महिलांनी प्रवेश करु नये यासाठी भाविकांकडून आंदोलन करण्यात येत होते. गेल्या काही दिवसांपासून मंदिर परिसरात तणावग्रसत्त परिस्थिती होती. याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या सर्व घडामोडीनंतर अखेर दोन महिलांनी मंदिरात प्रवेश मिळवला आहे. मात्र, या प्रवेशावर भाजपने नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा – VIDEO: शबरीमाला मंदिराची ऐतिहासिक परंपरा मोडली

- Advertisement -

काय म्हणाले अमित मालवीय?

भाजपचे माहिती व तंत्रज्ञानाचे राष्ट्रीय प्रमुख अमित मालवीय यांनी ही घटना जर खरी असेल तर ही एक विनाशकारी असल्याचे म्हटले आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन ही प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर ही परंपरा मोडली जाऊ नये म्हणून अनेक राजकीय नेत्यांकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विरोध केला जात होता. न्यायालयात याविषयी पुन्हा याचिका दाखल करणार असा दावा काही राजकारण्यांकडून करण्यात येत होता.

- Advertisement -

काय म्हणाल्या स्मृती इराणी?

महिला प्रवेशाच्या मुद्यावर केंद्रिय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी याअगोदर देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी महिलांना प्रवेश न देता परंपरा टिकवून ठेवण्यास प्राधान्य दिले आहे. बुधवारी दोन महिलांच्या प्रवेशानंतर आता इराणी यांनी देखील ट्विटरवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. याविषयी इराणी म्हणाल्या की, प्रार्थना करायचा अधिकार असला तरी पवित्र स्थळांचा अपमान करायचा अधिकार आपल्याला नाही. त्याचबरोबर मी हिंदू आहे आणि माझा पती पारशी आहे. मला पारशींच्या अग्निमंदिरात प्रवेश करुन प्रार्थना करायला बंदी आहे, असे देखील त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -