घरमहाराष्ट्रमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर नितेश राणे यांच्या गाडीचा अपघात

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर नितेश राणे यांच्या गाडीचा अपघात

Subscribe

पिंपरी – महाराष्ट्रातील अपघातसत्र काही थांबायचं नाव घेत नाहीयत. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अपघातात अनेक उद्योगपतींपासून राजकीय नेत्यापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. शिवसंग्राम नेते विनायक मेटे आणि प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्रि यांचा अपघात ताजा असतानाच आज भाजप नेते आमदार नितेश राणे यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील उर्से टोलनाक्यानजीक हा अपघात घडला असून सुदैवाने यात कोणीही जखमी नाही.

हेही वाचा – सायरस मिस्त्री अपघात प्रकरण : ग्रीन कॉरिडोरने अनाहिता पंडोले रिलायन्स रुग्णालयात दाख

- Advertisement -

नितेश राणे यांचे कुटुंब पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरून प्रवास करत होते. नितेश राणे यांच्या पत्नी, मुलं, नातेवाईक या गाडीतून प्रवास करत होते. उर्से टोलनाक्यावर गाडी टोल भरण्यासाठी रांगेत थांबली होती. तेव्हा पाठीमागून ट्रकने राणे कुटुंबीयांच्या गाडीला जोरदार धडक दिली. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झालेली नाही. हा अपघात घडला तेव्हा नितेश राणे गाडीत नव्हते.

गाडीला पाठून धडक दिल्याने गाडीच्या मागच्या बाजूचा इंडिकेटर फुटला आहे. दरम्यान, या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. या अपघातामागे नेमकं काय कारण आहे याचा तपास पोलिसांकडून केला जातोय. ट्रकचा ब्रेक दाबताना हा अपघात घडला असावा असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जातोय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -