घरमहाराष्ट्रविजय वडेट्टीवार मंत्री होणार नितेश राणेंचा दावा; तर भास्कर जाधव म्हणतात, पुढच्या...

विजय वडेट्टीवार मंत्री होणार नितेश राणेंचा दावा; तर भास्कर जाधव म्हणतात, पुढच्या सहा महिन्यांत…

Subscribe

राज्यातील मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार हा सध्या रखडलेला आहे. परंतु सत्ताधाऱ्यांच्यासोबत असणारे अनेक आमदार हे त्यांना मंत्रीपद मिळणार, या आशेवर बसलेले आहेत. परंतु आता विरोधक आणि सत्ताधारी यांच्याकडून मंत्रीपदाबाबत करण्यात येणाऱ्या विधानांमुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

मुंबई : राज्यातील मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार हा सध्या रखडलेला आहे. परंतु सत्ताधाऱ्यांच्यासोबत असणारे अनेक आमदार हे त्यांना मंत्रीपद मिळणार, या आशेवर बसलेले आहेत. परंतु आता विरोधक आणि सत्ताधारी यांच्याकडून मंत्रीपदाबाबत करण्यात येणाऱ्या विधानांमुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. राजकीय नेत्यांमध्ये मंत्रीपदाची असलेली लालसा ही काही कमी होताना दिसत नाही, परंतु त्यांच्याकडून करण्यात येणाऱ्या विधानांमुळे मात्र राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. (Nitesh Rane claim that Vijay Wadettiwar will become minister; Bhaskar Jadhav says, in the next six months…)

हेही वाचा – ठाकरेंचे खासदार अरविंद सावंतांची कोंडी करण्यासाठी भाजपाचा डाव

- Advertisement -

एकीकडे भाजप आमदार नितेश राणे हे पुढील काही महिन्यांमध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे भाजपमध्ये प्रवेश करून मंत्री होण्याचा दावा करत आहेत. तर दुसरीकडे, ठाकरे गटातील आमदार आणि नेते असलेले भास्कर जाधव पुढील सहा महिन्यांमध्ये ते स्वतः मंत्री होणार असल्याचे म्हणत आहे. एका कार्यक्रमामध्ये भास्कर जाधव यांच्याकडून हा दावा करण्यात आलेला आहे. त्यामुळे नेमके खरे कोणाचे? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

सिंधुदुर्गातील एका सभेत बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, ही लढाई आपली आहे, तुमची आणि माझीच आहे. फक्त सहाच महिने उरलेत. सहा महिन्यांनी हा भास्कर जाधवच या भागात, या जिल्ह्यात, या राज्यात स्वाभिमानाने आणि सन्मानाने मंत्री म्हणून फिरेल. त्यामुळे आजपर्यंत जशी साथ निभावली, तशीच साथ निभवावी, अशी विनंती त्यांनी नागरिकांना केली.

- Advertisement -

भास्कर जाधव यांनी मंत्रीपदाबाबत केलेले विधान मोठे असले तरी सर्वाधिक चर्चा होत आहे ती आमदार नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याची. कारण काही दिवसांपूर्वी नितेश राणे यांनी तर थेट विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हेच भाजपमध्ये प्रवेश करणार असे सांगितले होते. ते इतक्यावरच थांबले नाही तर वडेट्टीवार यांना मंत्रीपद देखील देण्यात येणार असल्याचा दावा नितेश राणे यांच्याकडून करण्यात आला होता.

विजय वडेट्टीवार यांच्याबाबत बोलताना नितेश राणे म्हणाले होते की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बॉम्ब घेऊन फिरत आहेत का? त्यांनी भाजपतील स्फोटावर बोलण्यापेक्षा येत्या हिवाळी अधिवेशनापर्यंत विजय वडेट्टीवार यांच्यावर लक्ष ठेवावे. वडेट्टीवार आगामी हिवाळी अधिवेशनापर्यंत कदाचित मंत्री होतील अशी चर्चा आमच्या महायुती सरकारमध्ये सुरू आहे, असे स्पष्ट विधान नितेश राणे यांच्याकडून करण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -