Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी 'साहेबांनी टाकलेला विश्वास सार्थकी ठरवतील', अजित पवारांकडून नवनियुक्त कार्यकारी अध्यक्षांना शुभेच्छा

‘साहेबांनी टाकलेला विश्वास सार्थकी ठरवतील’, अजित पवारांकडून नवनियुक्त कार्यकारी अध्यक्षांना शुभेच्छा

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला 24 वर्ष पूर्ण होऊन पक्ष 25 व्या वर्षात पदार्पण करणार आहे. 25 वर्षांपूर्वी शरद पवार यांच्या नेतृत्वात पक्षाची स्थापना केली गेली. त्यावेळी पी ए संगमा व तारिक अन्वर हे देखील शरद पवार यांच्या साथीला होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. खासदार सुनिल तटकरे, डॉ. योगनानंद शास्त्री, के.के. शर्मा, पी.पी. महोम्मद फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, एस. आर. कोहली, नसीम सिद्दकी या सहकाऱ्यांना पक्षांतर्गत विविध महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

शरद पवारांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत दिलेल्या जबाबदाऱ्या सर्व सहकारी यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास व्यक्त करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

- Advertisement -

विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात की, शरद पवार साहेबांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली ‘ऱ्हदयात महाराष्ट्र… नजरे समोर राष्ट्र’… हा विचार घेऊन रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडण-घडणीत मोलाचे योगदान देईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता, पादाधिकारी याच ध्येयाने काम करतील, हा विश्वास आहे. नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांचे पुन:श्च अभिनंदन, असं ट्वीट पवारांनी केलं आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वर्धापन दिन हा अहमदनगरमध्ये साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा याआधीच करण्यात आली होती. पण त्यानंतर हवामान खात्याने हवामानाबाबत दिलेल्या माहितीमुळे या ठिकाणचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. परंतु या निमित्ताने आज राज्यभरात पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


हेही वाचा : NCP : राष्ट्रवादी काँग्रेसची 25 वर्षे; रौप्य महोत्सवी वर्षात पक्षाचे पदार्पण


 

- Advertisment -