घरमहाराष्ट्रकॉलेज सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय नाही

कॉलेज सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय नाही

Subscribe

उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती

राज्यात कॉलेज सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. यूजीसीने गाईडलाईन दिली आहे, त्याबाबत सगळ्या कुलगुरुंची बैठक घेऊ, असं उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले आहेत. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी ते बोलत होते.

शासनाशी चर्चा करून विद्यापीठाने निर्णय घ्यावा, असं यूजीसीने सांगितलं आहे. दिवाळीनंतर आम्ही बैठक घेऊ, सध्या कोणताही निर्णय घेतलेला नाही. विद्यापीठ, महाविद्यालयांमधील कोविड परिस्थिती लक्षात घेता यूजीसीनं काही सूचना केल्या आहेत.विद्यार्थ्यांच्या सुरक्षा दृष्टिकोनातून विचार करून निर्णय घेऊ. यूजीसीने पत्र दिलं आहे, त्याचा सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन उदय सामंत यांनी दिलं आहे. १३ विद्यापीठात अपवाद वगळता सगळ्या परीक्षा पार पडल्या आहेत. २ लाख ५० हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, २ विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा दिली आहे. पास होण्याची तयारी ९३ टक्के आहे.

- Advertisement -

काही विद्यार्थ्यांना कंटेन्मेंट झोन, पूर आणि अन्य कारणाने परीक्षा देता आलेल्या नाहीत. त्यांचीच परीक्षा ही दिवाळीनंतर घेणार असल्याचं सांगितलं आहे. विद्यार्थ्यांचे पास होण्याचं प्रमाण हे १२ ते १३ टक्के वाढलं आहे. अनेक विद्यापीठांनी निकाल जाहीर केलेत. आम्ही जी मार्कशीट दिलीय ती रेग्युलर मार्कशीट आहे, त्यात कोविडचा उल्लेख नाही. पदवीदान मुलांना पण असेच सर्टिफिकेट देणार आहोत. ऑनलाइन आणि ऑफलाईन परीक्षा घेऊनही चांगला निकाल लागल्याचं सगळ्या महाविद्यालयाने दाखवून दिले आहे. एकही मुलगा बाधित झाला नाही. ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे बाकी आहे अथवा अन्य कारणांमुळे परीक्षा देऊ शकले नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांच्या उर्वरित परीक्षा या दिवाळीपूर्वी घेण्यात याव्यात. कोणत्याही विद्यार्थ्याच्या प्रमाणपत्रावर कोविड -१९ चा उल्लेख राहणार नाही. विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे त्यांचे पदवी प्रमाणपत्र देण्यात येईल, असंही सामंत यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -