घरक्राइमPune Crime : पुण्यातील प्रतिष्ठित शाळेत शिपायाकडून विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; पॉक्सो अंतर्गत...

Pune Crime : पुण्यातील प्रतिष्ठित शाळेत शिपायाकडून विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Subscribe

पुणे – पुण्यातील वाघोली येथील एका प्रतिष्ठित आणि नावाजलेल्या शाळेतील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेतील विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचाराची घटना घडल्याचे समोर आले आहे. शाळेतील शिपायाने मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी पुण्यातील लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलाच्या आईने या संदर्भात लोणीकंद पोलीसात तक्रार दिली आहे.

शाळकरी विद्यार्थ्यावर शाळेच्याच शिपायाने अत्याचार केल्याचा आरोप होत आहे. यामुळे शालेय प्रशासनावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. संशयित आरोपी शिपायाने अत्याचाराबाबत कोणाला काही न सांगण्याची धमकी विद्यार्थ्याला दिली होती. त्यामुळे पीडित मुलगा भयभीत झाला आणि त्याने याबद्दल कुठेही वाच्यता केली नव्हती अशीही माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

पीडित मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा 10 वर्षांचा मुलगा हा वाघोलीमधील एका नामांकित शाळेत आहे. 19 एप्रिल रोजी मुलाच्या आईने त्याला शाळेमध्ये सोडले. त्यानंतर आरोपीने पीडित मुलाला त्याचे नाव विचारले. त्याच्याशी लगट करत त्याच्यासोबत गोड बोलून त्याला ‘तुला चित्रपट पाहायला आवडतात का?’असे विचारले. मुलाने हो म्हटल्यानंतर नंतर आरोपीने, चल टॉयलेटमध्ये जाऊ, तिथे तुला एक पिक्चर दाखवतो असे म्हटले. पीडित मुलाने त्याला नकार दिला. मात्र आरोपीने ‘इथले सगळे कॅमेरे बंद आहेत तू काही काळजी करू नकोस कोणाला काही समजणार नाही’ असं सांगितलं आणि त्याच्यावर जबरदस्ती करू लागला. त्याच्या या कृत्याला घाबरुन मुलगा तिथून पळून गेला.

आरोपीच्या या कृतीला घाबरून पीडित मुलगा घटनास्थळावरुन पळून गेला. थोड्या वेळाने आरोपी पुन्हा वर्गात येऊन तुला इथेच फिल्म दाखवतो, असे म्हणून त्याने मोबाईलमधील क्लिप मुलाला दाखवल्या. याबद्दल कोणाला काही सांगू नको अशी धमकी दिली. पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात या संपूर्ण प्रकरणी पॉक्सो केलं अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळेतील शिपायानेच हे कृत्य केल्यानं पालकांमधून संताप व्यक्त होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Kolhapur Crime : कोल्हापुरात 23 वर्षीय तरुणावर गोळीबारासह धारदार शस्त्राने वार; 5 संशयितांची नावे समोर


Edited by – Unmesh Khandale 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -