घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रलाचखोर मुख्य लेखाधिकार्‍याकडे कोट्यवधीचे घबाड

लाचखोर मुख्य लेखाधिकार्‍याकडे कोट्यवधीचे घबाड

Subscribe

३ फ्लॅट, ११ लाख कॅश, अर्धा किलो सोनं

अहमदनगर : महापालिकेच्या मुख्य लेखाधिकारी प्रवीण मानकर (वय ५२) यांना ठेकेदाराचे बिल देण्याच्या बदल्यात २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. पथकाने त्यांच्या घराची झडती घेतली असता त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली.

कंत्राटदाराकडे १५ हजार रुपयांची लाच मागितल्याच्या गुन्ह्यात लाच लुपचपत प्रतिबंधक पथकाने मानकर यांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली. उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या पथकाने आरोपीच्या पुण्यातील विश्रांतवाडी येथील घराची झडती घेतली. त्यावेळी घरात ११ लाख, ५० हजारांची रोकड, ५४० ग्रॅम सोने, दीड किलो चांदी आढळली. ही संपत्ती कोठून आली, याचे समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही. त्यामुळे पोलिसांनी ती जप्त केली आहे. त्यांच्या पुण्यातील तीन फ्लॅटची कागदपत्रे आढळून आली आहेत. मानकर हे नगरच्या दिल्लीगेट भागातील रहिवाशी असून सध्या पुण्यात वास्तव्यास आहेत. कंत्राटदाराकडून 5 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी ते सापळ्यात अडकले. त्यांच्याकडे मोठी संपत्ती आढळून आल्याने महापालिकेच्या कारभाराबद्दल नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -