घरमहाराष्ट्रक्षितिजाकाठी तो दिसला...मन उधाण झालं!

क्षितिजाकाठी तो दिसला…मन उधाण झालं!

Subscribe

मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रात १० जूनला दाखल

तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टीला झालेल्या वादळी पावसामुळे मान्सूनचा पाऊस पुढे जाण्याची व्यक्त होत असलेली शक्यता आता मागे पडली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात १० जूनलाच मान्सूनचा पाऊस सुरू होईल, असे सांगण्यात आले आहे. यावर्षाचा पाऊस अंदमान-निकोबार येथे दाखल झाला असल्याने तो केरळला ३१ मेलाच दाखल होईल, असे अनुमान आहेत.

भारतीय हवामान शास्त्र विभागाने जाहीर केल्याप्रमाणे शुक्रवार 21 मे रोजी नैऋत्य मान्सून बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भाग, निकोबार बेटे, संपूर्ण दक्षिण अंदमान समुद्र आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात दाखल झाला आहे. 1 जूनला केरळमध्ये मान्सून दाखल होणार असा अंदाज काही दिवसांपूर्वी आयएमडीने वर्तवला होता. पण आता अंदमान-निकोबारमध्ये मान्सून पोहोचला असल्यामुळे केरळमध्ये मान्सून 1 जून अगोदरच म्हणजेच 31 मे दाखल होण्याचा अंदाज देण्यात आला आहे.

- Advertisement -

अंदमानाच्या समुद्रात सरासरी 20 ते 21 मे दरम्यान मौसमी वार्‍याचे आगमन होते. त्यानंतर केरळ किनारपट्टीला मौसमी वारे धडकतात. मात्र तोक्ते चक्रीवादळामुळे मान्सूनच्या आगमनाला उशीरा होईल, असे अनुमान व्यक्त होत होते. हवामान खात्याने ह अंदाज फेटाळून लावले आहेत. यामुळे यावर्षीच्या पावसाची राज्यातील सुरुवात १० जूनपासून शक्य असल्याचे सांगण्यात आले आहे.

तत्पूर्वी पुढील 3 ते 4 दिवसांत महाराष्ट्रासह घाट भागात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. सोमवारी आणि मंगळवारी पुणे, सातारा, नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस होणार आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. खरेतर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्रातील हवामानात विविध बदल नोंदले गेले आहे.

- Advertisement -

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्याने चक्रीवादळाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे अंदमान समुद्रात कोणीही जाऊ नये, अशा सूचना दिल्या आहेत. २१ ते २५ मे दरम्यान हे वादळ राहणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. मात्र या चक्रीवादळाचा आणि मान्सूनच्या आगमनाचा काहीही संबंध नसेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळेच केरळमध्ये ३१ मे पर्यंत मान्सून सुरू झाल्यावर तो 10 जूनपर्यंत तळकोकणात दाखल होऊ शकतो आणि उर्वरित महाराष्ट्रात 15 ते 20 जूनदरम्यान पावसाच्या सरी बरसतील, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -