घरमहाराष्ट्रमध्य रेल्वेने वर्षभरात 500 स्टंटबाज धरले

मध्य रेल्वेने वर्षभरात 500 स्टंटबाज धरले

Subscribe

टिकटॉकवर सुध्दा आता नजर

थरकाप उडवणार्‍या स्टंटबाजीचे व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर अपलोड करण्याची स्पर्धा जणू तरुणांमध्ये लागली आहे. या स्टंटबाजीच्या प्रयत्नांमुळे अनेकांना आपला जीव सुध्दा गमवावा लागले आहे. त्यामुळे या स्टंटबाजामुळे रेल्वे प्रशासनाची डोकेदुखी वाढली होती. त्यामुळे रेल्वेने 2019 मध्ये या स्टंटबाजावर मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे.गेल्या वर्षभरात 498 स्टंटबाजांवर आरपीएफने कारवाई केली आहे.आतापर्यंत या स्टंटबाजांना एक लाख 96 हजार 50 रुपये दंड आकारण्यात आला आहे. इतकेच नव्हेतर आता या स्टंटबाजावर लक्ष ठेवण्यासाठी रेल्वे पोलीस सोशल मीडियावर अपलोड केलेल्या व्हिडीआेंवर सुध्दा लक्ष ठेवणार आहे.त्यामुळे आता रेल्वे परिसरात आणि धावत्या गाड्यांत स्टंटबाजीचे व्हिडीओ तयार करणार्‍यांची आता खैर नाही.

सोशल मीडियावर सध्या स्टंटबाजी करणारे व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहेत.त्यातच काय तर याना प्रोत्साहन देण्यासाठी नव नविन मोबाईल अ‍ॅप आले आहे. सध्या टिकटॉक व्हिडिओची क्रेझ आहे. तरुणाईकडून व्हिडिओ बनविण्याचे प्रमाण अधिक आहे. हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मात्र, ते बनविताना अनेक जण जीव धोक्यात घालून व्हिडिओ चित्रित करताना दिसुन येत आहे.

- Advertisement -

या व्हीडियोंमध्ये धावत्या लोकलमध्ये चढणे, लोकलमधून बाहेर लटकत सिग्नलवर हात मारणे, लोकलच्या टपावर चढणे असे विविध प्रकार निदर्शनास येतात. दरम्यान, बहुतेक वेळा स्टंटबाजी करताना लोकलमधून पडून किंवा लोकलखाली चिरडून स्टंटबाजांचा मृत्यू झाल्याचे प्रकार अनेक वेळा समोर आले आहेत. मात्र तरीही स्टंटबाजांची संख्या दिवसागणिक वाढत होती. त्यामुळे सोशल मीडियावर करडी नजर ठेवत गतवर्षी आरपीएफने थेट कारवाईची मोहिम हाती घेतली. गेल्यावर्षी तब्बल 498 स्टंटबाजांविरोधात कारवाई करण्यात आली.

सध्या कमी कालावधीत फेमस होण्याचे प्रमाण टिकटॉकवर आहे. या टिकटॉकसहित इतर समाज माध्यमांवर रेल्वे पोलिसांची नजर असणार आहे. रेल्वे परिसरात आणि धावत्या रेल्वे गाड्यांतील स्टंटबाजीचे व्हिडिओ टाकणार्‍यांवर कारवाईचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. त्यामुळे आता रेल्वे परिसरात आणि धावत्या गाड्यात स्टंटबाजीचे व्हिडीओ तयार करणार्‍यांची आता खैर नाही. इतकेच नव्हे, तर स्टंटबाजी करणार्‍यांसह त्यांचे व्हीडियो घेणार्‍यानाही तुरूंगात पाठवण्याची तरतूद मध्य रेल्वेने केली आहे.

- Advertisement -

स्टंटबाजांचे जंक्शन कुर्ला
मध्य रेल्वेच्या कुर्ला रेल्वे स्टेशनवर सर्वाधिक चोरीचा घटनांची नोंद असते. याच स्थानकांत आता स्टंटबाजीची घटनांपैकी 25 टक्के स्टंटबाज हे कुर्ला रेल्वे स्थानकाच्या हद्दीत पकडण्यात आले आहेत. सर्वाधिक म्हणजेच 97 स्टंटबाजांविरोधातील कारवाई ही मेन व हार्बर लाईनला जोडणार्‍या कुर्ला रेल्वे स्थानकात केली आहे. त्यापाठोपाठ वडाळा आणि घाटकोपर पोस्टानेही 50 हून अधिक स्टंटबाजांविरोधात कारवाई केली आहे.

स्टंटचे प्रकार
* दरवाजाजवळ उभे राहून रुळाशेजारील विजेच्या खांबांना स्पर्श करणे.
* पाय घासून जाताना पायानेच अन्य प्रवाशाला स्पर्श करणे
*फलाटावरील प्रवाशाला हाताने मारणे
* धावत्या लोकलचा छतावर उभे राहणे
*रेल्वे रुळावर उभे राहून सेल्फी काढणे,
*गाडी स्थानकात उभी असताना उडी मारुन बाजूच्या गाडीत जाणे

रेल्वे परिसरात आणि धावत्या लोकलमध्ये धोकादायक स्टंटचे व्हिडिओ तयार करण्याची प्रकरणे समोर येत आहेत. मात्र हे केले जात असताना इतरही प्रवाशांंचा जीवही त्यामुळे धोक्यात येत आहे. आम्ही आवाहन करतो की,रेल्वे गाडी आणि परिसरात असे प्रकार करु नयेत. त्यासाठी तरुणांनी रेल्वेला सहकार्य करावे. अन्यथा निर्दशनात आले तर कारवाई करण्यात येईल. – शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -