घरमहाराष्ट्रआता राणेंची एन्ट्री!

आता राणेंची एन्ट्री!

Subscribe

भाजपचेही सत्तास्थापनेसाठी प्रयत्न -नारायण राणे

 काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केल्यावर पाठोपाठ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही त्यांची भूमिका माध्यमांसमोर मांडली. त्यानंतर रात्री ८ वाजता अचानक राज्यातील सत्तेच्या सारीपाटावर भाजपचे नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी एन्ट्री केली आणि एकच खळबळ उडवून दिली.

‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला ‘सत्तास्थापन करण्यासाठी प्रयत्न करा’, असे आदेश दिल्यामुळे आपण सत्ता स्थापनेसाठी जे जे करावे लागेल, ते ते सर्व प्रयत्न करणार आणि भाजपची सत्ता आणणार असे विधान करत राणे यांनी वर्षा बंगल्याबाहेरच सत्तास्थापनेमध्ये उडी घेतल्याचे दाखवून दिले आहे.

- Advertisement -

शिवसेनेची विचारधारा आणि दोन्ही काँगे्रेसची विचारधारा ही निराळी आहे, त्यामुळे शिवसेना सत्तास्थापनेसाठी दोन्ही काँग्रेसकडे जाणार नाही, असा ठाम विश्वास व्यक्त करत काँग्रेसचे नेते आता काय बोलतात, हे समजले पाहिजे. शिवसेनेने त्याचा अभ्यास केला पाहिजे. आघाडी शिवसेनेला उल्लू बनवत आहे. राजकारणात आता शिवसेना नवीन नाही. आपण या काँग्रेसच्या नेत्यांना चांगले ओळखतो, असेही राणे म्हणाले.

निवडणुकीपूर्वी शिवसेनेने युती केली आणि आता वेगळा विचार करणे हे नैतिकतेला धरून नाही, असे सांगत एकीकडे राज्यात शेतकर्‍यांप्रती कळवळा आहे, असे दाखवून राज्यभर अवकाळीग्रस्त भागाची पाहणी केली आणि जेव्हा त्यांना न्याय देण्यासाठी सरकार स्थापण्याची वेळ आली तेव्हा वेगळी वाट धरली, त्यामुळे सत्तास्थापनेला जो विलंब झाला आहे, त्याला शिवसेनाच जबाबदार आहे, असेही नारायण राणे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -