घरठाणेठाणे महापालिकेच्या वतीने महापुरुषांच्या विचारांचा जागर होणार - आयुक्त

ठाणे महापालिकेच्या वतीने महापुरुषांच्या विचारांचा जागर होणार – आयुक्त

Subscribe

ठाणे । महापुरुषांच्या जयंती किंवा पुण्यतिथी निमित्ताने त्यांना केवळ पुष्पहार अर्पण करून अभिवादन न करता त्यांच्या विचारांचा प्रसार व्यापक स्वरूपात झाला पाहिजे. यासाठी यापुढे ठाणे महापालिकेच्या वतीनेच पुढाकार घेण्यात येणार असून थोर विचारवंतांच्या व्याख्यानांमधून महापुरुषांच्या विचारांचा जागर केला जाणार असल्याचे प्रतिपादन पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे विशिष्ट समाजापुरते नसून त्यांचे विचार हे वैश्विक स्वरूपातील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

ठाण्यातील पत्रकारांच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या पत्रकार कक्षात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यासह पालिका आयुक्त अभिजित, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, संजय हेरवाडे, उपायुक्त पवार, कार्यालयीन अधीक्षक महेश आहेर असे महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थिती होते.

- Advertisement -

ठाणे महापालिकेच्या पत्रकार कक्षात पहिल्यांदाच अभिवादनाचा कार्यक्रम करण्यात आल्याने पालिका अधिकार्‍यांनीही या उपक्रमाला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. आपल्या भाषणात माजी महापौर म्हस्के यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबाबद्दल विशेष उल्लेख करून आजच्या पत्रकारांनी देखील बाबासाहेबांच्या पत्रकारितेचा आदर्श घ्यायला हवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खर्‍या अर्थाने जोतिराव फुले यांचा पत्रकारितेचा वारसा पुढे नेला होता. पत्रकारांनी बाबासाहेब आंबेडकर यांचा हा आयामही ध्यानात घेतला पाहिजे, असे आवाहन केले.
या अभिवादन कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -