घरमहाराष्ट्रदीपावलीनिमित्त मुंबईतील सार्वजनिक स्थळे, महत्त्वाचे रस्ते, वाहतूक बेटे रोषणाईने झगमगणार

दीपावलीनिमित्त मुंबईतील सार्वजनिक स्थळे, महत्त्वाचे रस्ते, वाहतूक बेटे रोषणाईने झगमगणार

Subscribe

मुंबई : दीपावली सण संपूर्ण मुंबईसह देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदाच्या दीपावलीला महत्त्वाच्या सार्वजनिक स्थळी, रस्ते, वाहतूक बेटे आदी ठिकाणी २२ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत मुंबई महापालिका विद्युत रोषणाई करणार आहे. त्यामुळे मुंबई महानगरीचे सौंदर्य अधिक खुलणार आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्ताने, मुंबई महापालिकेच्या वतीने घरोघरी तिरंगा अभियान राबवताना संपूर्ण मुंबई महानगर तिरंगा विद्युत रोषणाईने झळाळून निघाले होते. त्याला मिळालेला मुंबईकरांचा प्रतिसाद लक्षात घेता, दीपावली सणाच्या निमित्ताने २२ ते २९ ऑक्टोबर या एका आठवड्याच्या कालावधीसाठी मुंबईतील महत्त्वाची सार्वजनिक स्थळी, रस्ते, वाहतूक बेटे इत्यादींवर विद्युत रोषणाई करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

- Advertisement -

मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्प आणि दीपावलीनिमित्ताने मुंबई महानगरात करावयाच्या विद्युत रोषणाईबाबत महापालिका आयुक्त (प्रभारी) तथा अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (२० ऑक्टोबर) दूरदृश्य प्रणालीद्वारे पार झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त (शहर) आशिष शर्मा, अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्यासह सर्व संबंधित सहआयुक्त, सहायक आयुक्त व खातेप्रमुख उपस्थित होते.

मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्पाअंतर्गत ठिकाणे निश्चित करून निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश पालिका आयुक्त डॉ. इकबाल चहल यांनी मागील आढावा बैठकीत दिले होते. त्याअनुषंगाने कार्यवाही किती पूर्ण झाली आहे, याची माहिती प्रारंभी आयुक्तांच्या अनुपस्थित पालिका आयुक्त (प्रभारी) आश्विनी भिडे यांनी विभागनिहाय जाणून घेतली. मुंबई महानगरातल्या पायाभूत कामांना सौंदर्यात्मक रुप बहाल करणारा आणि सकारात्मक भावना निर्माण करणारा असा मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्प हा प्रशासनासाठी आणि राज्य सरकारसाठी देखील जिव्हाळ्याचा प्रकल्प आहे. त्यामुळे त्याची कार्यवाही वेळेवर होईल अशा दृष्टीने प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करुन लवकरात लवकर कामे सुरू करावीत, सर्व कामांच्या प्रगतीवर देखरेख ठेवण्यासाठी डॅशबोर्ड स्वरुपातील संगणकीय प्रणाली देखील माहिती तंत्रज्ञान खात्याकडून उपलब्ध करून दिली जात असून त्यामध्ये माहिती अद्ययावत करावी, असे निर्देशही आश्विनी भिडे यांनी यावेळी दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -