घरमहाराष्ट्रनुकसानग्रस्त भागात सरकारच्या वांझोट्या भेटी, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जाणार शेतकऱ्यांच्या बांधावर

नुकसानग्रस्त भागात सरकारच्या वांझोट्या भेटी, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जाणार शेतकऱ्यांच्या बांधावर

Subscribe

राज्यात अनेक भागात झालेल्या गारपिटीमुळे पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालं आहे. मात्र सरकार नुकसानग्रस्त भागात वांझोट्या भेटी आणि घोषणा देत आहे. सरकारने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत केली पाहिजे.

मुंबई – राज्यात अनेक भागात झालेल्या गारपिटीमुळे पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालं आहे. मात्र सरकार नुकसानग्रस्त भागात वांझोट्या भेटी आणि घोषणा देत आहे. सरकारने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत केली पाहिजे. यासाठी आजपासून नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार असल्याची माहिती अंबादास दानवे यांनी दिली.

गारपीटीमुळे नुकसान झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने कोणताही दिलासा दिला नाही. सरकारने त्वरीत मदतीचा निर्णय घेतला पाहिजे असे दानवे म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान, विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन शिंदे-फडणवीस सरकारला पत्र लिहिले आहे. अजित पवार आज दुपारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट देखील घेणार आहेत.

‘रॅपर राजेश मुंगसेच्या पाठीशी उभे राहणार’
रॅपर राजेश मुंगसेला कोर्टाकडून जामीन मंजूर झाला असून यापुढे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) त्याच्या पाठीशी उभी राहणार असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज दिली. राजेश मुंगसे याने पन्नास खोके वरती रॅप सॉंग तयार केलं, त्यामुळे त्याच्यावर सत्ताधारी पक्षातील लोकांनी गुन्हा दाखल केला होता. त्याने वैयक्तीक कोणावर टिका केली नाही. इंग्रज काळातही अशी कारवाई केली नाही, त्याच्यापुढे जाऊन सत्ताधारी हे मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे टीकास्त्र दानवे यांनी सोडले.

- Advertisement -

राजेश मुंगसे याने त्याच्या रॅपमध्ये कोणाचे नाव घेतले नाही किंवा अपशब्दाचा प्रयोग केला नाही. अशा प्रकारे गुन्हा दाखल करणे योग्य नाही. एकप्रकारे सत्ताधारी लोकशाहीचा अपमान करत आहेत, अशी टीका दानवे यांनी केली.

ज्यांनी तक्रार केली त्यांच्या ट्विटरवरतीही पन्नास खोकेचा मेसेज आहे. बैलांच्या अंगावर पन्नास खोके लिहिण्यात आले होते, नवरात्रीमध्ये ही अनेक महिलानी ५० खोके म्हणाल्या, मग प्रत्येकावर कारवाई करणार का, असा संतप्त सवाल दानवे यांनी उपस्थित केला. याविरोधात कायदेशीर लढा लढणार असल्याचे दानवे म्हणाले.

हेही वाचा : राज्य सहकारी बँक घोटाळा : ईडीकडून आरोपपत्र दाखल; अजित पवार, सुनेत्रा पवारांचे नाव नाही

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -