घरताज्या घडामोडीराज्य सहकारी बँक घोटाळा : ईडीकडून आरोपपत्र दाखल; अजित पवार, सुनेत्रा पवारांचे...

राज्य सहकारी बँक घोटाळा : ईडीकडून आरोपपत्र दाखल; अजित पवार, सुनेत्रा पवारांचे नाव नाही

Subscribe

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Opposition Party Leader Ajit Pawar) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून आरोप पत्र दाखल करण्यात आले आहे. मात्र या आरोपपत्रात अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे नाव नाही. त्यामुळे एकाच प्रकरणात अजित पवार यांना दुसरा दिलासा मिळाला आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Opposition Party Leader Ajit Pawar) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून आरोप पत्र दाखल करण्यात आले आहे. मात्र या आरोपपत्रात अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे नाव नाही. त्यामुळे एकाच प्रकरणात अजित पवार यांना दुसरा दिलासा मिळाला आहे. बुधवारी सकाळी यासदर्भात माहिती समोर आली आहे. (State Co-operative Bank Scam Charge sheet filed by ED Ajit Pawar and Sunetra Pawar are not named)

न्यायालयाने अद्याप या प्रकरणाची दखल घेतली नसून पुढील सुनावणी 19 एप्रिल रोजी होणार आहे. बहुचर्चित राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात अजित पवार यांना क्लिन चीट मिळाली होती. त्यावेळी अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यासह 65 जणांना क्लिन चीट मिळाली होती. दरम्यान, 25 हजार कोटी रुपयांच्या या राज्य सहकारी बँक घोटाळ्यामध्ये अजित पवार यांचे नाव समोर आल्याने खळबळ उडाली होती.

- Advertisement -

या प्रकरणात विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, बँकेचे तत्कालिन अध्यक्ष माणिकराव पाटील, उपाध्यक्ष बाळासाहे सरनाईक, आनंदराव अडसूळ या महाराष्ट्रातील बड्या नेतेमंडळींचे नाव समोर आले होते. याप्रकरणी राज्याच्या सहकार विभागाने चौकशीसाठी समितीचे गठन केले होते.

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत सुमारे 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे म्हटले जाते होते. या घोटाळ्याबाबत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे, माजी मंत्री शालिनीताई पाटील, माजी आमदार माणिक जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल झाला होता. यानंतर ईडीनेही गुन्हा दाखल केला होता. विशेष म्हणजे याच गुन्ह्यात ईडीने जरेंडेंश्वर सहकारी साखर कारखाना जप्त केला होता. त्यानंतर इतर साखर करखान्याबाबत ईडीने तपास सुरु केला होता.


हेही वाचा – निवडणुका येताच त्याच मुस्लिमांशी चुंबाचुंबी; ‘सामना’तून भाजपावर हल्लाबोल

अजित पवारांबद्दल काही सांगता येत नाही – शरद पवार
2019 मध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी झाला होता. तसा प्रयोग भविष्यात होणार की नाही, हे आज सांगू शकत नाही, असं सुचक वक्तव्य शरद पवारांनी केलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत एका प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, भविष्यात कोण-कशी भूमिका घेईल हे आज नाही सांगता येणार. पण तो निर्णय त्या व्यक्तीचा निर्णय असेल. पण सध्या हे तीन (काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षांच्या नेत्यांची मानसिकता ही एकत्रित काम करण्याची आहे. त्यामुळे मला सध्या काळजी नाही. असेही पवारांनी यावेळी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -