घरताज्या घडामोडीराज्यात ३१ मार्चपर्यंत जनता कर्फ्यू लागू - आरोग्यमंत्री

राज्यात ३१ मार्चपर्यंत जनता कर्फ्यू लागू – आरोग्यमंत्री

Subscribe

जनता कर्फ्यू उद्या ५ वाजेपर्यंत वाढवण्यात आला आहे.

राज्यातील जनतेच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने जनता कर्फ्यू वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच आज घेण्यात आलेला जनता कर्फ्यू उद्या सकाळी ५ वाजेपर्यंत वाढवण्यात आला आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तसेच हा कर्फ्यू येत्या ३१ मार्चपर्यंत लागू करण्यात येईल. मात्र, यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात येणार आहेत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

काय म्हणाले आरोग्यमंत्री?

आज घेण्यात आलेल्या जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर दोन आदेश काढण्यात येणार आहेत. यामध्ये पहिल्या आदेशात आजच्या जनता कर्फ्यूचा कालावधी उद्या सकाळी ५ वाजेपर्यंत वाढण्यात आला आहे. त्यानंतर सर्व पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ३१ तारखेपर्यंत दुसरा जमावबंदी आदेश काढण्यात येणार आहे.

- Advertisement -

५ पेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमू नये

दरम्यान, उद्या सकाळी ५ वाजल्यानंतर ५ पेक्षा जास्त लोकांनी समू नये. मात्र, या आदेशातून काही संस्था वगळण्यात आल्या आहेत. त्यामध्ये बँक, फायनान्शिल, दूध, भाजीपाला, विमान, रुग्णालये, मीडिया, बंदरे, इंटरनेट, पेट्रोल आणि एनर्जी संबंधीत बाबीही वगळण्यात आल्या आहेत.

प्रत्येक सरकारी कार्यालयात केवळ ५ टक्के कर्मचारी उपस्थित राहतील. जनहित, लोकांचे आरोग्याच्या दृष्टीने हे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे त्याचा कुणीही गैरफायदा घेऊ नये. तसेच मंदिरामध्ये गर्दी करु नये, ‘मीच माझा रक्षक’ हा संदेश सर्वांनी पाळायला हवा, असे आवाहनही टोपे यांनी केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – महाराष्ट्रात लॉकडाऊनची घोषणा – मुख्यमंत्री


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -