घरताज्या घडामोडीसार्वजनिक वाहतूक सुरु करा अन्यथा रस्त्यावर उतरू; प्रकाश आंबेडकरांचा इशारा

सार्वजनिक वाहतूक सुरु करा अन्यथा रस्त्यावर उतरू; प्रकाश आंबेडकरांचा इशारा

Subscribe

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारच्या विरोधात पुन्हा एकदा रणशिंग फुंकले आहे. लॉकडाऊनच्या काळात रुतलेलं अर्थव्यवस्थेचे चाक बाहेर काढण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि सर्वप्रकारची दुकाने लवकर सुरु करा, अशी मागणी त्यांनी पुन्हा लावून धरली आहे. या गोष्टी लवकरात सुरु कराव्यात अन्यथा १० ऑगस्टनंतर रस्त्यावर उतरून कायदा हातात घेऊ, अशा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

पुणे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकर म्हणाले की, राज्यात वाहतूक व्यवस्था, दुकाने कधी उघडणार याचे वेळापत्रक सरकारने जाहीर करावे. रामभरोसे थांबवावे, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल. दुकानांची सम-विषम पद्धत लवकर बंद करावी, असेही ते म्हणाले. हातावर पोट असलेल्या कामगारांची उपासमार होत आहे. त्यातच आता राज्यात महापुराचे संकट येऊ घातले आहे. कोरोना कोरोना किती दिवस करत बसणार? ५ टक्के लोकांसाठी किती दिवस ९५ टक्के लोकांना वेठिला धरले जाणार? असा संतत्प सवालही त्यांनी उपस्थित केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -