घरमहाराष्ट्र२०१४ ला राष्ट्रवादीचे डिपॉझिट जप्त झाले होते, त्या भीतीनेच पवार कुटुंब रस्त्यावर...

२०१४ ला राष्ट्रवादीचे डिपॉझिट जप्त झाले होते, त्या भीतीनेच पवार कुटुंब रस्त्यावर – श्रीरंग बारणे

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून पवार कुटूंब हे पार्थ पवार यांच्या प्रचारात सक्रिय झाले असून ते ठीक ठिकाणी प्रचार करताना दिसत आहेत. आज विरोधक श्रीरंग बारणे यांनी पवार कुटुंबावर टीका केली. चाळीस अंश सेल्सिअल तापमान असताना भर उन्हात पवार कुटुंब फिरत आहे. याचा अर्थ त्यांचा पराभव निश्चित असल्याच बारणे म्हणाले. पराभवाच्या भीतीनेच ते रस्त्यावर उतरले आहेत, असे बारणे म्हणाले. ते उमेदवारी अर्ज भरण्याल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ४० अंश सेल्सिअस तापमानात भर उन्हात पवार कुटुंब फिरत आहे. याचाच अर्थ त्यांचा प्रभाव निश्चित आहे. पराभव दिसत असल्यानेच पवार कुटुंब रस्त्यावर प्रचार करताना दिसत आहे, अशी टीका बारणे यांनी पवार कुटुंबावर केली आहे. कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये मोठा उत्साह होता. गेल्या पाच वर्षांपासून लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांशी जोडलो गेलेलो आहे. केंद्रातून अनेक योजना या मतदार संघात आणलेल्या आहेत. ही निवडून विकासाच्या द्वारे लढवत आहे, असे बारणे म्हणाले.

- Advertisement -

हे वाचा – भाजप कार्यालयावर निवडणूक आयोगाचा छापा; भाजपला दणका

पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी राष्ट्रवादीचे नेतृत्व नाकारले आहे. त्यांचा महानगर पालिकेच्या निवडणुकीत पराभव झालेला आहे. मावळ मतदार संघात राष्ट्रवादीचे प्राबल्य नाही. केवळ घराण्यातील व्यक्ती पुढे करून राष्ट्रवादी पक्ष निवडणूक लढवत आहे. या अगोदर झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचा पराभव झालेला आहे. त्यांचं डिपॉझिट जप्त झाल्याची आठवण बारणे यांनी करून दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -