घरमहाराष्ट्रपवना धरणातून ४७८५ क्युसेक पाण्याचा विसर्ग

पवना धरणातून ४७८५ क्युसेक पाण्याचा विसर्ग

Subscribe

लोणावळ्यात जोरदार पाऊस,पुण्यात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा, पैसे भरले नाही म्हणून रुग्णाला ठेवले डांबून या बातम्यांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी वाचा पुणे विभागातील महत्वाच्या बातम्या ...

राज्यात पावसाचा जोर वाढला असून पुण्याच्या मावळमध्ये येळसे शिवली हा पूल पाण्याखाली गेला आहे. तर दुसरीकडे अनेक गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी जास्त पाऊस झाल्याचे निदर्शनास येत आहे. पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण हे ओसंडून वाहत असून गेल्या २४ तासांत ६४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच लोणावळा क्षेत्रात देखील ९६ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने वर्षाविहारासाठी येणार्‍या पर्यटकांची गर्दी होत आहे.

राज्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. याचा फायदा शेतकर्‍यांसह शहरवासीयांना झाला आहे. लोणावळा हे पर्यटनस्थळ म्हणून ओळख जाते. येथील भुशी डॅम ओसंडून वाहत आहे. लोणावळ्यात गेल्या २४ तासांत ९६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून या वर्षात आतापर्यंत ४२४८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर गेल्यावर्षी ४१३२ मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक पाऊस झाल्याने शेतकरी सुखावले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पवना धरण क्षेत्रात गेल्या २४ तासांत ६४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत ऐकून २७७४ मिलिमीटर एवढा पाऊस झाला असून गेल्यावर्षी २५८२ मिलिमीटर एवढा पाऊस झाला होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी धरण क्षेत्रात जास्त पाऊस झाला आहे. पवना धरणातून ४७८५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पवना नदी काठी राहात असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisement -

 

आदित्य बिर्ला हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

पुणे । चिंचवडमधील आदित्य बिर्ला हॉस्पिटलने आर्थिक दुर्बल घटकातील एका रुग्णावर मोफत उपचार न करता उपचाराचे पैसे देत नाही म्हणून रुग्णाला गेल्या ९ दिवसांपासून डांबून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या हॉस्पिटलवर व हॉस्पिटलच्या सीईओ रेखा दुबे यांच्यावर फसवणूक व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अजिज शेख यांनी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्याकडे केली आहे. दरम्यान, अजिज शेख, त्यांचे कार्यकर्ते तसेच रुग्ण दशरथ शिवाजी यांच्या नातेवाइकांनी आदित्य बिर्ला हॉस्पिटलकडून होत असलेल्या अन्यायाविरोधात धरणे आंदोलन सुरू केले आहे.

- Advertisement -

दशरथ शिवाजी आरडे (वय ७२, रा. कैलासनगर, पिंपरी) यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना ८ ऑगस्ट रोजी चिंचवड येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारासाठी त्यांनी हॉस्पिटलमध्ये दहा हजार रुपये भरले. तसेच हॉस्पिटलने त्यांना औषधे बाहेरून आणण्यास लावले. त्यामुळे त्यांनी औषधांवरही हजारो रुपये खर्च केले आहेत. वास्तविक दशरथ आरडे हे आर्थिक दुर्बल घटकांतील आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार होणे हा त्यांचा कायदेशीर हक्क आहे. आर्थिक दुर्बल घटकात मोडत असल्याचे सर्व कागदोपत्री पुरावे त्यांनी हॉस्पिटल व्यवस्थापनाला दाखविले.तरीही हॉस्पिटलने त्यांच्यावर मोफत उपचार केले नाहीत.

उपचारानंतर त्यांना ११ ऑगस्ट रोजी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. परंतु, उपचाराचा खर्च देण्याची त्यांची ऐपत नसल्यामुळे हॉस्पिटलने गेल्या नऊ दिवसांपासून त्यांना सोडलेले नाही. तसेच त्यांचे औषध व जेवणही बंद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या नातेवाइकांनाही त्यांना भेटू दिले जात नाही. दशरथ आरडे यांना हॉस्पिटलच्या सीईओ रेखा दुबे यांनी अक्षरशः डांबून ठेवले आहे. त्यामुळे हॉस्पिटल व्यवस्थापन व सीईओ रेखा दुबे यांच्यावर फसवणूक आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, अजिज शेख, त्यांचे कार्यकर्ते तसेच रुग्ण दशरथ शिवाजी यांच्या नातेवाइकांनी आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये या अन्यायाविरोधात धरणे आंदोलन सुरू केले आहे.

डॉक्टरची 8 लाखांची फसवणूक

Doctor
प्रातिनिधिक फोटो

पुणे ।आयटी निरीक्षकाने त्याच्या साथीदारांसोबत मिळून एका डॉक्टरची 7 लाख 90 हजार 47 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान निगडी येथे घडला. डॉ. विकास सीताकांत साळस्तेकर (वय 61, रा. पालवी बंगला, सेक्टर 27, प्लॉट नंबर 232, प्राधिकरण) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार स्नेहा सिंग, रूपा तोमर, राजू वर्मा, सुनील गोयल, झा यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्नेहा आणि रूपा या आयटी इन्स्पेक्टर आहेत. राजू आणि सुनील आयटी ऑफिसर आहेत. स्नेहा आणि रूपा यांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून डॉ. विकास यांच्या वडिलांच्या नावावर असलेले प्रॉव्हिडंट फंडचे 3 लाख 10 हजार 990 रुपये त्यांच्या खात्यावर जमा झाल्याचे सांगितले. मात्र ही रक्कम काढण्यासाठी वेगवेगळ्या कारणांसाठी पैशांची मागणी केली. डॉ. विकास यांनी स्नेहा आणि रूपा यांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या बँकेच्या खात्यावर 4 लाख 79 हजार 57 रुपये एनईएफटीद्वारे जमा केले. मात्र त्यांना प्रॉव्हिडंट फंडची रक्कम परत मिळाली नाही. यातून डॉ. विकास यांची 7 लाख 90 हजार 47 रुपयांची फसवणूक झाली. यावरून आरोपींविरोधात फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पुण्यात हिंदुत्त्ववादी संघटनांचा मोर्चा

पुणे । सनातनच्या साधकांवरील खोटे गुन्हे तसेच सनातन संस्थेवरील बंदीची मागणी मागे घेण्यात यावी यासाठी पुण्यात हिंदू जनजागृती समिती, सनातन तसेच इतर हिंदुत्ववादी संस्थांतर्फे मोर्चा काढण्यात आला. पुण्यातील महाराणा प्रताप उद्यान चौकापासून कसबा गणपती मंदिरापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. हातात मागण्यांचे फलक घेत अनेक साधक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. त्यातही महिलांची संख्या अधिक होती.

या मोर्चाचे कसबा मंदिरासमोर सभेत रुपांतर झाले. यावेळी दाभोलकरांची हत्या झाल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दाभोलकरांची हत्या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या लोकांनी केल्याचे म्हंटले होते. त्यांच्या या विधानामुळे दाभोलकरांच्या हत्येचा तपास भरकटला असल्याचा आरोप हिंदु जनजागृती समितीचे पराग गोखले यांनी केला. तसेच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांचाही यावेळी समाचार घेण्यात आला. त्यांच्या शिक्षण संस्थांमधील भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणल्याचा दावा गोखले यांनी केला. सनातनवर खोटे आरोप करण्यात येत आहेत. त्यामुळे सनातनवर बंदीची मागणी करण्यात येऊ नये अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. तसेच देशात हिंदूवर होणारा अत्याचार सहन केला जाणार नाही आज पाचशे चोक रस्त्यावर उतरली आहेत, उद्या पाच हजार उतरतली असेही गोखले यावेळी म्हणाले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -