घरमहाराष्ट्रउद्यापासून शांततेत युद्ध सुरू, सरकारच्या छाताडावर बसणार पण...; जरांगे पाटलांनी दिला इशारा

उद्यापासून शांततेत युद्ध सुरू, सरकारच्या छाताडावर बसणार पण…; जरांगे पाटलांनी दिला इशारा

Subscribe

चौंडी : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी दिलेला 40 दिवसांचा कालावधी आज (24 ऑक्टोबर) संपला. याचपार्श्वभूवर त्यांनी सरकारविरोधात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जरांगे पाटील यांनी नगरच्या चौंडी येथे आज धनगर समाजाच्या दसरा मेळाव्याला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी म्हटले की, उद्यापासून शांततेत युद्ध सुरू आहे. सरकारच्या छाताडावर बसणार पण आरक्षण सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. (Peaceful war will start from tomorrow will sit under the umbrella of the government Manoj Jarange Patil warned)

हेही वाचा – ड्रग्ज प्रकरणी पंकजा मुंडेंनी सांगितला गोपीनाथ मुंडेंचा अंडरवर्ल्ड संपवण्याचा किस्सा; सरकारला दिला ‘हा’ सल्ला

- Advertisement -

मराठा आरक्षणासंदर्भात सराकरला दिलेल्या अल्टिमेटमची आठवण करून देतान जरांगे पाटील म्हणाले की, धनगर समाजाला तीन आरक्षण असून आम्हाला मिळेना हे ऐकल्यावर मला तर कसतरी वाटलं. आम्हाला संध्याकाळपर्यंत आरक्षण मिळेल अशी आशा आहे. त्यांच्याकडे विमान आहे. ते इकडून-तिकडून जाऊन लगेच येतात. मात्र आरक्षण देण्यासाठी इतकी टाळाटाळ करत आहेत. आता सरकारला दिलेली मुदत संपत आली आहे. त्यांचे फोन येत आहेत, अभ्यासाला वेळ पाहिजे, पण आम्ही नकार दिला. आतापर्यंत अभ्यास खूप झाला, त्यांनी काय वाचलेत कुणास ठाऊक, पण आज सायंकाळपर्यंत मुदत आहे, ती संपली की विषय संपला, असा इशाराच जरांगे पाटलांनी यावेळी राज्य सरकारला दिला.

धनगर-मराठा समाज लहान-मोठा भाऊ नाही, तर रक्ता मासांचे आहेत. धनगर समाज बांधवाना घटनेत आरक्षण दिलेले असताना आम्हाल आरक्षण कसं मिळत नाही, याचं आश्चर्य वाटतं. पण आता आम्हाला सावध व्हावं लागेल. मराठा बांधव धनगर समाजाच्या मागे उभा राहील. मला माझ्या जातीशी दगाफटका करता आला असता, पण मी माझ्या जातीशी प्रामाणिक आहे. त्यामुळे आरक्षण मिळवणायसाठी जीवाचं रान करा, पेटून उठा. लेकरांच्या भल्यासाठी आपल्याला हे करावे लागणार आहे, असे जरांगे पाटील म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Sharad Pawar : युवा संघर्ष यात्रा नव्या पिढीची दिंडी; शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास

जरांगे पाटील मंचावर जाण्याआधी थांबले अन् नंतर चढले

नगरच्या चौंडी येथे आज धनगर समाजाच्या दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी जरांगे पाटील चौंडीत दाखल झाले. सुरुवातीला त्यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळाला भेट देऊन अभिवादन केले आणि सभास्थळी दाखल झाले. मात्र मंचावर राजकीय नेते उपस्थित असल्याने जरांगे पाटील काहीकाळ मंचाच्या खालीच थांबले. हे पाहून दसरा मेळाव्याच्या आजोजकांनी स्वत: जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितले की, मंचावर उपस्थित असलेले राजकीय नेते हे पक्षाचे पदाधिकारी म्हणून नाही तर धनगर बांधव म्हणून आलेले आहेत, असे सांगितले. यानंतर जरांगे पाटील मंचावर चढले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -