घरमहाराष्ट्रPankaja Munde: जिंकण्यासाठी निष्ठा गहाण ठेवू शकत नाही, पंकजा मुंडेंचा इशारा नेमका...

Pankaja Munde: जिंकण्यासाठी निष्ठा गहाण ठेवू शकत नाही, पंकजा मुंडेंचा इशारा नेमका कोणाला?

Subscribe

पंकजा मुंडे म्हणाल्या की, तुम्ही जिंकण्यासाठी काहीही करू शकता, पण जिंकण्यासाठी निष्ठा गहाण ठेवू शकत नाही. नितीमत्ता गहाण ठेवू शकत नाही.

बीड (सावरगाव): भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज दसरा मेळाव्याच्या निमित्ताने सावरगावमधून आपल्या शेकडो कार्यकर्त्यांना संबोधित केलं. पंकजा दसरा मेळाव्याला काय भूमिका मांडतात. याकडे संपूर्ण राज्याचं लागलेलं होतं. त्यामुळे त्यांच्या भाषणाला जास्त महत्त्व प्राप्त झालं होतं. अखेर पंकजा मुंडे यांनी आज सविस्तर भूमिका मांडली. यावेळी त्या म्हणाल्या की, निवडणूक जिंकण्यासाठी मी निष्ठा गहाण ठेऊ शकत नाही. (Pankaja Munde Loyalty can t be mortgaged to win Pankaja Munde s warning to whom exactly)

पंकजा मुंडे म्हणाल्या की, तुम्ही जिंकण्यासाठी काहीही करू शकता, पण जिंकण्यासाठी निष्ठा गहाण ठेवू शकत नाही. नितीमत्ता गहाण ठेवू शकत नाही. त्या पुढे म्हणाल्या की, मी माझा आणि तुमचा स्वाभिमान मरू देणार नाही. मी कुठल्याही प्रकार तुम्हाला अंतर देणार नाही. मी तुम्हाला न्याय देण्यासाठी 2024 पर्यंत मैदानात आहे आणि तुमची इच्छा असेल तर तिथून मला कुणीच हटवू शकणार नाही.

- Advertisement -

माझी निष्ठा लेचीपेची नाही

पंकजा मुंडे म्हणाल्या की, माझ्यावर रोज आरोप होतो. कोण म्हणतं ताई या पक्षात चालल्या, कोणी म्हणत ताई त्या पक्षात चालल्या. पण पंकजा मुंडे यांची निष्ठा एवढी लेचीपेची नाही. पदं देऊन तुम्हाला ती मिळवता आली नाही. पदं न देता निष्ठा काय असते ती या लोकांना विचारा. यांच्या मनावर हजार आघात झाले, दहा वेळा यांचे स्वप्न तुटले. तरी यांच्या डोळ्यात एक नवीन स्वप्न परत जन्म घेत आहेत, अशी भूमिका पंकजा मुंडे यांनी मांडली.

मुंडे म्हणाल्या की, पडले तर पडले. कोण पडत नाही? ब्रह्मा, विष्णू, महेश सुद्धा युद्धांमध्ये हरले. भैरवांनी तर ब्रम्हाचं एक शीर खेटून टाकलं. शिवालासुद्धा हनुमानासमोर युद्ध करताना नतमस्तक व्हावं लागलं आहे. विष्णुला सुद्धा संकटाला सामोरं जावं लागलं आहे. या देवांना संकट आहे, देवाला सुद्धा लाखो असुरांसोबत युद्ध करावं लागतं तर आपण युद्धाला का तयार नाही? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

- Advertisement -

(हेही वाचा: श्रीकृष्णालाही मथुरेतून द्वारकेत जावे लागले… पंकजा मुंडेंचे मतदारसंघ बदलण्याचे संकेत )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -