घरमहाराष्ट्रनगराध्यक्षांना वेळेत नाश्ता न देणे शिपायाच्या जीवावर बेतले

नगराध्यक्षांना वेळेत नाश्ता न देणे शिपायाच्या जीवावर बेतले

Subscribe

आजराच्या नगराध्यक्षांनी शिपायाला दिवसभर उभे राहून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना नमस्कार करण्याचे आदेश दिले होते. अवघ्या दीड दिवसात सुरेश यांना शिक्षेच्या ताणामूळे हृदयविकाराचा झटका आला.

नगराध्यक्षांनी दिलेल्या शिक्षेमुळे एका शिपायाला हृदयविकाराचा झटका आल्याची घटना कोल्हापूरात घडली आहे. कोल्हापूरच्या आजरा नगरपंचायतीमध्ये हा प्रकार घडला आहे. नाश्त्याची सोय वेळेत केली नाही म्हणून नगराध्यक्षांनी शिपायाला येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना नमस्कार करण्याचे आदेश दिले. या शिक्षेमुळे शिपायाला हृद्यविकाराचा झटका आला.

एक वडा जीवावर बेतला

कोल्हापूरच्या आजरा नगरपंचायतीच्या भाजप नगराध्यक्षा जोत्स्ना चराटी यांनी सुरेश जाधव या शिपायाला नाश्ता आणायला सांगितले होते. सुरेश यांनी वेळत वडे आणले नाही त्यामुळे संतापलेल्या नगराध्यक्षांनी सुरेश यांना शिक्षा दिली. दिवसभर उभे राहून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना नमस्कार करण्याचे आदेश दिले. पण नगराध्यक्षांना वेळत वडा न देणे सुरेश यांच्या जीवावर बेतला. अवघ्या दीड दिवसात सुरेश यांना शिक्षेच्या ताणामूळे हृदय विकाराचा झटका आला.

- Advertisement -

शिपायावर उपचार सुरु

गुरुवारी आजरा नगरपंचायतीची मासिक सभा होती. कर्मचाऱ्याला उभे राहण्याची शिक्षा दिल्यावरून विरोधी नगरसेवकांनी सभेवर बहिष्कार घातला. याच दरम्यान सभासद असतानाच शिपाई सुरेश जाधव हे जमिनीवर कोसळले. विरोधी नगरसेवकांनी सुरेश यांना ताबडतोब आजरा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्याठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर गडहिंग्लज येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये सुरेश जाधव यांच्यावर उपचार सुरू आहेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -