घरनवी मुंबईTruck Driver Strike : ट्रक चालकांच्या आंदोलनाला नवी मुंबईत हिंसक वळण; पोलिसांकडून...

Truck Driver Strike : ट्रक चालकांच्या आंदोलनाला नवी मुंबईत हिंसक वळण; पोलिसांकडून गुन्हा दाखल

Subscribe

नवी मुंबई : केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटर वाहन कायद्याला इंधनाची वाहतूक करणाऱ्या टॅंकरचालकांनी विरोध दर्शविला असून, आज सोमवार (1 जानेवारी) पासून संपाचे हत्यार उपसले आहे. देशासह महाराष्ट्रातील ट्रक चालकांनी आंदोलन करण्यास सुरू केली आहे. याचपार्श्वभूमीवर नवी मुंबई ते जेएनपीटी मार्गावर कोंबडभुजे गावालगत असलेल्या रस्त्यावर ट्रक चालकांचे आंदोलन शांततेत सुरु असताना अचानक चिघळले. आंदोलन करणाऱ्या ट्रक चालकांनी साडे अकरा ते बारा दरम्यान, पुन्हा रस्ता अडवण्याचा प्रयत्न सुरु केला. यावेळी आंदोलनांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. पण ट्रक चालकांनी त्या पोलिसावरच हल्ला चढवला. आंदोलकांनी पोलिसाला बांबूने मारहाण करत पळवून लावले. (Truck Driver Strike Truck driver agitation turns violent in Navi Mumbai Babu beat the police)

हेही वाचा – IIT BHU : अटकेच्या भीतीने मध्य प्रदेशात प्रचाराला गेलो; बलात्कार प्रकरणातील आरोपींनी सांगितला घटनाक्रम

- Advertisement -

अपघाताला आळा बसावा यासाठी केंद्र सरकार कठोर पाऊले उचलत आहे. नवीन मोटार वाहन कायद्यानुसार ट्रकमुळे एखादा व्यक्ती जखमी झाल्यास त्याला तत्काळ रुग्णालयात नेले पाहिजे, तसे न केल्यास आणि ट्रकचालक दोषी आढळून आल्यास त्याला 7 वर्षांची शिक्षा आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. याला इंधन वाहतूक करणाऱ्या टॅंकरचालकानी विरोध दर्शविला आहे. सरकारच्या या नवीन कायद्याविरोधात ट्रक चालकांनी आज सकाळपासून नवी मुंबईतून जाणार्‍या उरण-जेएनपीटी महामार्गावर ट्रक चालकांची विरोध दर्शवत रस्त्यावर उतरले होते. यावेळी पोलिसांसोबत झालेल्या बाचाबाचीनंतर ट्रक चालक आक्रमक झाले. यावेळी संतप्त ट्रक चालकांना पांगवण्यासाठी पोलीस लाठीचार्ज करत असताना ट्रक चालकांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना बांबूने मारहाण केली. दुपारी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दोघा ट्रक चालकांना एनआरआय पोलिसांनी अटक केल्याची माहिती उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.

नवी मुंबई, कळंबोली, उरण, उलवे येथे सकाळपासून केंद्र सरकारच्या कायद्याला विरोध दर्शवत ट्रक चालकांनी आपली वाहने रस्त्यावर थांबवली होती. त्यामुळे मोठी वाहतुक कोंडी झाली होती. उरण जेएनपीटी मार्गावरही ट्रक चालकांनी रास्ता रोको करत आंदोलन सुरु केले आहे. मात्र यावेळी पोलिसांनी त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला असता संतप्त चालकांनी पोलिसांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ट्रक आणि डंपर चालकांनी रस्त्यावर वाहनं उभी केल्याने पोलिसांनी त्यांना रस्ता रिकामा करण्यास सांगितलं. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. काही आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली, तर काहीजण बांबू घेऊन पोलिसांच्या मागे लागले. त्या ठिकाणी कार्यरत असणारे वरिष्ठ पोलिस अधिकारी यांना बांबूने मारहाण करण्यास सूरुवात केली. सदर घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तत्काळ पोलिसांनी अधिक कुमक घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी आतापर्यंत 50 पेक्षा अधिक जणांना ताब्यात घेत, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Koregaon Bhima विजयस्तंभाच्या स्मारकासाठी शासनाने ‘शंभर’ एकर जमीन संपादीत करावी; आठवलेंची मागणी

आंदोलनकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल

नवी मुंबई, पोलीस उपायुक्त परिमंडळ-1 चे विवेक पानसरे यांनी सांगितले की, उरण-जेएनपीटी मार्गावर रेती बंदर येथे ट्रक, ट्रेलर आणि डंपर चालकांनी पुकारलेल्या चक्का जाम आंदोलनादरम्यान पोलिसांवर हल्ला करणार्‍या 40 ते 50 आंदोलनकर्त्यांविरोधात सरकारी कामात अडथळा आणून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापुढे ट्रक चालकांनी शांततेत आंदोलन न केल्यास त्यांच्याविरोधात पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल, अशी माहिती विवेक पानसरे यांनी दिली.

नवा मोटार वाहन कायदा काय आहे ?

देशात 28 लाखांहून अधिक ट्रक चालक 100 अब्ज किलो मीटरचे अंतर कापतात. या ट्रकवर 50 लाखांहून अधिक लोक काम करतात. अशा परिस्थितीत ट्रकमुळे होणारे रस्ते अपघातही सर्रास घडत असतात. हे रोखण्यासाठी केंद्र सरकारने नवीन कायदा आणला असून यामुळे नवीन मोटार वाहन कायद्यानुसार ट्रकमुळे एखादा व्यक्ती जखमी झाल्यास त्याला तत्काळ रुग्णालयात नेले पाहिजे, तसे न केल्यास आणि ट्रकचालक दोषी आढळून आल्यास त्याला सात वर्षांची शिक्षा आणि 10 लाख रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -