घरमहाराष्ट्रपिल्लई ग्रुपचा फिफाशी करार

पिल्लई ग्रुपचा फिफाशी करार

Subscribe

विद्यार्थ्यांना क्रीडा व्यवस्थापनाचे धडे

विद्यार्थ्यांना क्रीडा व्यवस्थापनाचे धडे गिरविण्याची संधी देण्यासाठी महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या पिल्लई ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटने फिफा आणि सीआयईएस संस्थांशी करार केला आहे. विद्यार्थ्यांना अशी संधी देणारी आशिया खंडातील ही पहिली शैक्षणिक संस्था ठरली आहे.

फिफा (फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फुटबॉल असोशिएशन) आणि स्वित्झर्लंड येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा अभ्यास केंद्र (सीआयईएस) या जागतिक संस्थ्यांच्या माध्यमातून दिला जाणारा क्रीडा व्यवस्थापनाचा कार्यक्रम नवीन पनवेल येथील महात्मा एज्युकेशन सोसायटीत उपलब्ध करण्यात आला आहे. जगातील विविध 15 देशांमध्ये खेळाडूंना या दोन संस्थांच्या माध्यमातून क्रीडा व्यवस्थापनाचा अभ्यास शिकविला जातो. भारतासह आशिया खंडात यापूर्वी कुठेही न शिकविला जाणारा अभ्यासक्रम पिल्लईमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षांपासून या करारासाठी प्रयत्न सुरू होते. अभ्यासक्रमात सहभागी होण्यासाठी आशिया खंडातून आलेल्या 300 हून अधिक अर्जांपैकी 40 अर्जदारांना पहिल्या टप्प्यातील अभ्यासक्रमासाठी सहभागी करून घेण्यात आले आहे.

- Advertisement -

पिल्लई महाविद्यालयात झालेल्या शुभारंभाला अल्टिमेट टेबल टेनिस आणि चेन्नई फुटबॉल क्लबच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विटा दाणी, सीआयईसचे व्यवस्थापक रोनाल्ड चॅवल्हिन, पिल्लई क्रीडा व्यवस्थापन अभ्यासक्रमाचे संचालक प्रणव पिल्लई, पिल्लई ग्रुपचे अध्यक्ष डॉ. के. एम. वासुदेवन, सल्लागार शाजी प्रभाकरन, फिफाचे अधिकारी व अन्य यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -