घरताज्या घडामोडीPM Modi In Italy : मोदी - पोप फ्रान्सिस भेट, भारत भेटीचे...

PM Modi In Italy : मोदी – पोप फ्रान्सिस भेट, भारत भेटीचे दिले निमंत्रण

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे G20 परिषदेच्या निमित्ताने दोन दिवसीस रोम दौऱ्यावर आहेत. इटालियन पंतप्रधान मारिओ द्राघी यांच्या निमंत्रणानंतर त्यांनी हा दौरा केला. आज शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वॅटीकनमध्ये पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. मोदींनी आजच्या भेटीनंतर पोप फ्रान्सिस यांना भारत दौऱ्यासाठी निमंत्रित केले. आजच्या दौऱ्यात मोदींसोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर होते. ही बैठक अवघ्या २० मिनिटांसाठी नियोजित होती. पण प्रत्यक्षात मात्र ही बैठक एक तास चालल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

- Advertisement -

पोप फ्रान्सिस यांच्यासोबत खूपच चांगली चर्चा झाली. मला या भेटीत अनेक विषयांवर बोलण्याची संधी मिळाली. भेटीनंतर मी पोप यांना भारत भेटीला बोलावले असल्याचे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पर्यावरणीय बदल आणि दारिद्र्य निर्मूलन यासारख्या अनेक विषयावर या भेटीत चर्चा झाली. या भेटी दरम्यान अटल बिहार वाजपेयी पंतप्रधान असतानाची आठवणही बोलून दाखवली असल्याचे कळते. १९९९ मध्ये पोप जॉन पॉल २ यांनी भारत दैरा केला होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान पोप फ्रान्सिस यांना भारत भेटीला निमंत्रित करण्यात आले आहे.

पोप यांच्या भेटीसाठी कोणताचे अजेंडा ठरलेला नव्हता. एखाद्या पवित्र विषयावर जेव्हा आपण बोलतो तेव्हा कोणताही अजेंडा नसते. या गोष्टीचा आम्ही मान राखला. जागतिक पातळीवर तसेच भारतासाठी काय महत्वाचे आहे, यासारख्या विषयावर बैठकीत चर्चा झाल्याची प्रतिक्रिया परराष्ट्र सचिव हर्ष वर्धन श्रींगला यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिली आहे. या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी हे युकेतील ग्लास्को येथे COP26 बैठकीसाठी रवाना होणार आहेत. ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी मोदींना या बैठकीसाठी आमंत्रित केले आहे. याआधी शुक्रवारी पंतप्रधान यांनी दौऱ्यादरम्यान विविध समाजाशी, भारतीय लोकांशी तसेच भारताचे मित्र असलेल्या संस्थांशी गाठीभेटी घेतल्या.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -