घरताज्या घडामोडीअनिल परब शिवसेनेचे कलेक्टर, ST कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येवरुन नारायण राणेंची टीका

अनिल परब शिवसेनेचे कलेक्टर, ST कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येवरुन नारायण राणेंची टीका

Subscribe

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर टीकास्त्र डागलं आहे. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येवरुन आणि आंदोलनावरुन परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर नारायण राणेंनी घणाघात केला आहे. अनिल परब एसटी चालवू शकतात एवढं त्यांनी कमावले आहे. अनिल परब शिवसेनेचे कलेक्टर आहेत असं एकेरी भाषेत नारायण राणे म्हणाले आहेत. दरम्यान नारायण राणे यांनी मालवणमध्ये सी वर्ल्ड प्रकल्प आणि राजापूरमधील नाणार रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित जागेवर उभारणार असल्याचे सांगितले आहे. यासाठी कितीही विरोध केला तरी हे प्रकल्प होणार असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजप कार्यकार्ता मेळाव्यामध्ये परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर घणाघात केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना अनिल परब शिवसेनेचे कलेक्टर असल्याची टीका नारायण राणेंनी केली आहे. नारायण राणे म्हणाले की, एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत. पगार कित्येक महिन्यांपासून त्यांना मिळाले नाहीत ही अवस्था एसटी कर्मचाऱ्यांची आहे. गाड्यांना रस्त्यावर येण्याची परवानगी देऊ नये अशा प्रकारची अवस्था गाड्यांची झाली आहे. खर तर त्यांनी त्यांच्या उत्पन्नातून एसटी चालू शकते एवढे त्यांनी कमवले आहे. सगळ्यांचे पैसे ते गोळा करतात. शिवसेनेचे कलेक्टर आहेत असे नारायण राणे म्हणाले.

- Advertisement -

सी वर्ल्ड प्रकल्प प्रस्तावित जागी होणार

केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मालवणमधील ठराविक जागीच सी वर्ल्ड प्रकल्प करणार असल्याचे सांगितलं आहे. कोणीही कितीही विरोध केला तर ते बाजूला होतील. परंतु प्रकल्प निश्चित केलेल्या जागी होणार असल्याचे सांगितले आहे. या प्रकल्पांना शिवसेनेकडून विरोध आहे. नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

राणेंचा जीव सी वर्ल्डमध्ये अडकलाय – राऊत

दरम्यान नारायण राणेंनी प्रकल्प कोकणात होणार असल्याचे ठणकावून सांगितलं आहे. यावर शिवसेना नेते विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. नारायण राणेंचा जीव सी वर्ल्ड प्रकल्पामध्ये अडकला आहे. कारण हा प्रकल्प ३०० एकर जागेवर होणार आहे. परंतु १४०० एकर जमीन खरेदी करुन त्या ठिकाणी नातेवाईकांच्या नावे हॉटेल उभं करणे हा नारायण राणेंचा धंदा आहे. राणे आता केंद्रीय मंत्री झाले तरी त्यांची त्यावर नजर असल्याचे विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Deglur By Election: देगलूर- बिलोली मतदारसंघात दुपारपर्यंत ३१ टक्के मतदान, वाचा आतापर्यंतचे अपडेट


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -