घरमहाराष्ट्रआरोप सिद्ध करा, नाहीतर कायदेशीर कारवाईला तयार राहा; संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा

आरोप सिद्ध करा, नाहीतर कायदेशीर कारवाईला तयार राहा; संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा

Subscribe

शिवसेनेचे खासदार, प्रवक्ते आणि नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. ईडीच्या नोटीसीवरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजपच्या काही नेत्यांनी संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबाला लक्ष्य केलं. यावरुन आता संजय राऊतांनी आक्रमक आक्रमक पवित्रा घेत निर्वाणीचा इशारा दिला आहे.आरोप सिद्ध करा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार राहा, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

संजय राऊत यांनी ट्विट करत इशारा विरोधकांना इशारा दिला आहे. “अचानक गोदी मीडिया मधिल कमळे फुलायला लागली आहेत. खास करून माझ्या कुटुंबाला ED ची नोटिस आल्याची बातमी प्रसारित झाल्यावर. जनतेला महित आहे की राजकीय पोपट कसे राजकीय हेतूसाठी वापरले जतात. माझ्या कुटुंबाचं नाव PMC आणि HDIL स्कॅममध्ये विनाकरण गोवण्यात आले आहे. मी आव्हान देतो की पुराव्यानिशी ते सिद्ध करा, नाहीतर कायदेशिर कारवाईला तयार रहा.
समझनेवाले को इशारा काफी है!” असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

- Advertisement -

राऊत यांच्या पत्नीची ५ जानेवारीला ईडीकडून होणार चौकशी

ईडीने वर्षा राऊत यांना मंगळवारी २९ डिसेंबरला चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, वर्षा राऊत यांनी ईडीला अर्ज करून ५ जानेवारीपर्यंत मुदत देण्याची विनंती केली होती. ती मान्य करताना ईडीने वर्षा राऊत यांना ५ जानेवारी रोजी ईडीच्या मुंबईतील कार्यालयात चौकशीसाठी हजर होण्यास सांगितलं आहे.

संजय राऊत ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर बरसले

ईडीच्या नोटीसीवरुन भाजपच्या नेत्यांनी संजय राऊतांना लक्ष्य केलं. कर नाही तर डर कशाला? संजय राऊतांना घटना मान्य नाही का? अशी विधानं भाजपच्या नेतेमंडळींनी केली. दरम्यान, आता भाजपला प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनी ‘सामना’च्या अग्रेलखातून तुफानी फटकेबाजी केली आहे. डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण, हेच तुमचं भविष्य असं म्हणत संजय राऊत बरसले.

- Advertisement -

हेही वाचा –  ‘डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण, हेच तुमचं भविष्य’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -