घरताज्या घडामोडीसुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये १२ तास चकमक, एका दहशतवाद्याची शरणागती

सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये १२ तास चकमक, एका दहशतवाद्याची शरणागती

Subscribe

जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरच्या सरहद्दीतील लावेपोरोच्या उमराबादमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये १२ तासांहून अधिक काळापासून चकमक सुरू आहे. काल रात्रीपासून ही चकमक सुरू झाली असून दोन दहशतवादी एक घरात लपून बसल्याची माहिती समोर आली होती. चकमकी दरम्यान सुरक्षा दलाने शरणागती पत्करण्यास सांगितल्यानंतर एका दहशतवादी यास तयार झाला असून त्याने सरेंडर केले आहे. पण दुसरा दहशतवादी मात्र अजून लपून बसला आहे. सुरक्षा दलावर हे दहशतवादी सातत्याने गोळीबार करत आहेत. या दोन्ही दहशतवाद्यांचा लष्कर संघटनाशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे.

पूंच जिल्ह्यात रविवारी सुरक्षा दलाने ‘जम्मू-काश्मीर गजनवी फोर्स’च्या २ दहशवाद्यांना पकडले. या दहशतवाद्यांकडून स्फोटक साहित्य जप्त करण्यात आली आहेत. सुरक्षा दलाने असे म्हटले आहे की, ‘गुप्तचरांच्या माहितीनुसार सुरक्षा दलाने आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी एकत्र येऊन पुंच जिल्ह्यातील मेंढरच्या गलुथा हरनीजवळी एका गाडीत २ दहशतवाद्यांना पकडले. यांच्याकडून विस्फोटाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.’

- Advertisement -

२०२०मध्ये २०३ दहशतवाद्यांचा केला खात्मा

दरम्यान २०२०मध्ये जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने २०३ दहशतवाद्यांना मारले. यामध्ये स्थानिक दहशवादी १६६ होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रशासित प्रदेशात यादरम्यान ४३ नागरिकांचा जीव गेला तर ९२ जण जखमी झाले. यावर्षात सुरक्षा दलाने ४९ दहशतवाद्यांना अटक केले तर ९ दहशतवाद्यांनी शरणागती पत्करली.


हेही वाचा – Farmer Protest: शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये आज बैठक; आंदोलनावर तोडगा निघणार?

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -