घरमहाराष्ट्रनाशिकपूनद पाणीपुरवठा योजनेच्या कामाला एक वर्षाची मुदतवाढ

पूनद पाणीपुरवठा योजनेच्या कामाला एक वर्षाची मुदतवाढ

Subscribe

सटाणा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत निर्णय

तुषार रौंदळ : विरगाव
सटाणा शहराचा पाणीप्रश्न निकाली काढण्यासाठी साकारण्यात येत असलेली पूनद पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी देण्यात आलेली डेडलाईन कोरोनाच्या परिस्थिती व पाणीपुरवठा योजनेच्या प्रलंबित असलेल्या कामामुळे विलंब होणार असल्याने संबंधित ठेकेदारास एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय शुक्रवारी (दि.१९) रोजी सटाणा नगरपालिकेच्या पालिका सभागृहात आयोजित सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. पालिकेची सभा नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
सर्वसाधारण सभेत १४ विषयांवर चर्चा होऊन हे विषय एकमताने मंजूर करण्यात आले आहेत. सटाणा शहरासाठीच्या  पाणी प्रश्नासाठी जिव्हाळ्याचा व महत्वाचा भाग असलेली पूनद ते सटाणा पाणीपुरवठा योजना पुर्णत्वास गेली आहे. परंतु शहरांतर्गत असलेली जलवाहिनी व योजनेतील अनुषंगिक प्रलंबित कामे करण्यासाठी कोरोनामुळे अडचणी आलेल्या आहेत. त्यामुळे ही योजना मुदतीत पूर्ण करणे शक्य नसल्याने योजनेच्या प्रलंबित कामासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबरोबरच शहरातील मुख्य बाजारपेठ, नामपूर रोड ते चौगाव रोड जोडणार्या नवीन रिंगरोडमध्ये दुभाजकात पथदीप उभारणीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. रस्ते स्वयंचलित  स्वच्छ करण्यासाठी यंत्रणेला मान्यता, खुल्या जागा लोकहितास्तव व सार्वजनिक वापराकरीता विकसित करण्यास मान्यता अशा विविध व महत्वाच्या विषयांवर चर्चा होऊन विषयांना मंजुरी देण्यात आलेल्या. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर बैठकीत सामाजिक अंतर ठेवून आसनव्यवस्था करण्यात आली होती.
 बैठकीस उपनगराध्यक्ष सोनाली बैताडे, सभापती दिनकर सोनवणे, नगरसेवक काकाजी सोनवणे, महेश देवरे, दीपक पाकळे, राहुल पाटील, मनोहर देवरे, बाळु बागुल, निर्मला भदाणे, संगिता देवरे, सुनिता मोरकर, भारती सूर्यवंशी, पुष्पा सूर्यवंशी, डॉ. विद्या सोनवणे, रुपाली सोनवणे, सुरेखा बच्छाव, शमा मन्सुरी व मुख्याधिकारी हेमलता बगळे आदी उपस्थित होते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -